Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

Bigg Boss 15: रितेशला ‘भाड्याच्या नवरा’ म्हटल्यामुळे भडकली राखी, रागाच्या भरात ओढले बिचकुलेचे केस!

‘बिग बॉस १५’मध्ये (Bigg Boss 15) वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून यातील खेळ चांगलाच रंगात आला आहे. असाच एक वाईल्ड कार्ड स्पर्धक अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichkule) सतत चर्चेत असतो. अभिजीत त्याच्या विचित्र गोष्टींमुळे चर्चेत असतो. लेटेस्ट एपिसोडमध्ये, राखी सावंतसोबत (Rakhi Sawant) विनोद करणे अभिजीतला चांगलेच महागात पडले आणि नंतर त्याला राखीची माफी देखील मागावी लागली.

खरंतर अभिजीत घरातील सदस्यांसोबत मस्ती करत होता आणि सलमान खानसारखेच (Salman Khan) सर्व स्पर्धकांना सल्ला देत होता. यावेळी तो म्हणाला की, “राखीने हा नवरा भाड्याने आणला आहे.” अभिजीतचे असे बोलणे राखी आणि रितेशला (Ritesh) अजिबात आवडले नाही. (bigg boss 15 rakhi sawant angry on abhijit bichukale who called his husband fake)

राखीने ओढले केस
कलर्स टीव्हीने याचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिजीत म्हणतो, “या पतीला निवडून आणला आहेस का?” त्याच्या अशा वक्तव्यावर राखीचा राग अनावर झाला आणि ती म्हणाली की, “तू म्हणालास, मी माझ्या नवऱ्याला भाड्याने आणले आहे, तूच भाड्याचा टट्टू आहेस.” यावर अभिजीत म्हणतो की, “राखी बिनकामाचा मुद्दा बनवू नकोस.” पण राखी चांगलीच भडकते आणि ट्रॉली वली बॅग फेकून देते. यानंतर, ती डायनिंग एरियामध्ये ठेवलेली खुर्ची उचलते आणि आपटते.

त्याचवेळी अभिजीत म्हणतो की, “हा फक्त विनोद होता, जसा सलमान खान करतो.” यावर राखी आणि रितेशचा अभिजीतशी वाद होतो आणि रितेश म्हणतो, “हे तुझ्या डोक्यात आहे, म्हणूनच तू बोलला आहेस.” प्रोमोमध्ये राखी अभिजीतचे केस ओढतानाही दिसत आहे.

अभिजीतने मागितली राखीची माफी
नंतर वातावरण हाताळत रश्मी अभिजीतला म्हणते की, “तू तुझ्या बायकोला भाड्याने आणलंस म्हटल्यावर तुला कसं वाटेल?” मग अभिजीतला त्याची चूक कळते आणि तो राखीची माफी मागतो. मात्र, नंतर अभिजीत बिग बॉसकडे तक्रार करतो, की हा रियॅलिटी शो नाही. इथे सगळेच ऍक्टिंग करत आहेत.

त्याच वेळी, घराघरात फिनालेच्या तिकीटाची रेस सुरू झाली आहे. तिकीट टू फिनालेमध्ये सर्व स्पर्धक एकमेकांच्या विरोधात दिसणार आहेत. कलर्स टीव्हीने तिकीट टू फिनालेचा प्रोमो रिलीझ केला आहे.

हेही वाचा- 

हे देखील वाचा