Saturday, July 6, 2024

पहिल्यांदाच सर्वांसमोर येणार राखी सावंतचा पती रितेश; ‘बिग बॉस १५’मध्ये अभिनेत्रीसह होणार सहभागी

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ‘बिग बॉस’च्या पहिल्या आणि चौदाव्या पर्वाचा भाग होती. आता बिग बॉस -१५ च्या घरात राखी सावंतचा पती रितेश धमाका करणार आहे. रितेशने म्हटले आहे की, ही त्याची पहिलीच पब्लिक अपिरियंस असेल, ज्याचे होस्टिंग सलमान खान करणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ संपल्यानंतर आता ‘बिग बॉस १५’ लवकरच टीव्हीवर दिसणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, ‘बिग बॉस १५’ शो प्रीमियर २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता होणार आहे.

आता तो ‘बिग बॉस -१५’च्या घरात धमाका करणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्री राखी सावंत तिचा पती रितेशसोबत ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार आहे. राखी सावंतच्या म्हणण्यानुसार, तिने एनआरआय रितेशसोबत २०१९ मध्ये लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर कोणीही रितेशचा चेहरा पाहिला नाही. राखी सावंतने सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या लग्नाच्या फोटोमध्ये रितेश कुठेच दिसत नव्हता. अशा परिस्थितीत, राखीने खरोखरच लग्न केले आहे की नाही, हे प्रश्न अनेकदा उपस्थित केले गेले.

प्रतीक सहजपाल आणि रितेश असणार स्पर्धक
‘बिग बॉस ओटीटी’मध्ये धमाल करणारा प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस १५’चा पहिला स्पर्धक आहे. तर राखी सावंतचा पती रितेश ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये दुसरे नाव आहे.

माध्यमांतील वृतानुसार, जेव्हा राखी सावंतच्या पतीला सांगण्यात आले की, सलमान खान आणि बिग बॉसचे इतर स्पर्धक त्याला शोधत आहेत, पण तो हजर झाला नाही. तेव्हा रितेशने सांगितले की, “मी माझ्या व्यावसायिक बांधिलकीमुळे भेटू शकलो नाही.” पण रितेशने सांगितले की, तो आता राखी सावंतसोबत ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार आहे.

रितेश आहे दुबईचा व्यापारी
वेगवेगळ्या ड्रेसिंग सेन्स, एंटिक्स आणि स्टेटमेंट्समुळे चर्चेत राहिलेल्या राखी सावंतने दुबईतील बिझनेसमॅन रितेशसोबत लग्न केले. तिने २०१९ मध्ये रितेशसोबत तिच्या लग्नाचा खुलासा केला. तिने सलमानच्या शोमध्ये खुलासा केला होता की, ती विवाहित आहे तसेच तिला मुलेही आहेत. राहुल वैद्यसमोर हे सांगताना ती भावूक झाली होती.

राखीने बिग बॉस १४ मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री म्हणून शोमध्ये प्रवेश केला होता. पण तिने १४ लाख रुपये घेऊन हा शो सोडला. या निर्णयाबाबत तिने आपली आर्थिक स्थिती चांगली नसल्याचा खुलासा केला होता.

‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले जंगल
आतापर्यंत टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या ‘बिग बॉस १५’ च्या प्रोमोमध्ये दाखवले आहे की, सलमानने एका जंगलात साइट सूट घातला आहे. हे स्पष्टपणे दर्शवते की, यावेळी बिग बॉसची थीम जंगलावर आधारित असू शकते. या प्रोमोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा व्हॉईस ओव्हरही आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा