Friday, July 5, 2024

Bigg Boss 15: राकेश बापट रुग्णालयात दाखल, किडनी स्टोनमुळे अचानक बिघडली तब्येत

‘बिग बॉस १५’च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या राकेश बापटला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. घरात राकेशची तब्येत अचानक बिघडली. त्याला किडनीमध्ये स्टोनची तक्रार आहे, त्यामुळे त्याला अचानक वेदना होऊ लागल्या. बिग बॉसच्या घरात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी राकेशला शोमधून बाहेर पडून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

राकेशने अलीकडेच ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश केला होता. त्याच्या एन्ट्रीने सर्वात आनंदी त्याची कथिक गर्लफ्रेंड शमिता शेट्टी झाली. दोघांना शोमध्ये डेटवरही पाठवले होते. जिथे विशाल कोटियन आणि जय भानुशाली यांनी त्यांच्यासाठी खास चायनीज फूड बनवले. दोघांनीही डेटचा आनंद लुटला. तसेच, राकेश हा शमितासाठी सर्वात मोठा आधार होता. पण तो असा अचानक शोमधून बाहेर पडल्याने शमिताला खूप दु:ख झाले आहे. (bigg boss 15 raqesh bapat admitted to hospital after severe kidney stone pain)

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांची पहिली भेट ‘बिग बॉस ओटीटी’च्या प्लॅटफॉर्मवर झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री दिसली, त्यानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. दरम्यान, शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यात भांडणही पाहायला मिळाले. पण शोच्या शेवटच्या दिवसांत ते पुन्हा एकमेकांच्या जवळ आले. एवढेच नाही, तर शो संपल्यानंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापट एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसले. आता राकेश लवकरात लवकर बरा होऊन घरी परतेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी राकेश बापटने एका निवेदनात म्हटले होते की, या रियॅलिटी शोमध्ये जाण्याचे कारण शमिताच आहे. तो म्हणाला, “प्रेम… एक असा शब्द आहे ज्याला खूप अर्थ आहे. मी शोमध्ये परत यावे यासाठी सतत मेसेज करणाऱ्या प्रेक्षकांचे, ट्वीट करणाऱ्या सर्व चाहत्यांचे प्रेम चुंबकासारखे काम करत आहे. आणि हो, शमिता मला ओटीटी सीझनमध्ये या प्रवासादरम्यान सापडली आणि मी तिच्यासोबत पुन्हा एकदा बिग बॉसच्या विचित्र घरात वेळ घालवण्यास उत्सुक आहे.”

दुसरीकडे वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यापासून शोमध्ये अधिक रंजकता आलेली पाहायला मिळत आहे. अशात आता पुढे काय काय ट्विस्ट येतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा