Tuesday, January 13, 2026
Home अन्य Bigg Boss 15: रश्मी देसाई राखी सावंतला म्हणाली ‘चीप’, तर देवोलीना भट्टाचार्जीनेही साधला मैत्रिणीवरच निशाणा

Bigg Boss 15: रश्मी देसाई राखी सावंतला म्हणाली ‘चीप’, तर देवोलीना भट्टाचार्जीनेही साधला मैत्रिणीवरच निशाणा

टेलिव्हिजनचा वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस १५‘ (Bigg Boss 15) च्या शेवटच्या आठवड्यात प्रवेश करण्यासाठी, आता घरातील सदस्यांमध्ये खडतर स्पर्धा होत आहे. प्रेक्षकांना शोमध्ये दररोज अनेक ट्विस्ट आणि गोंधळ पाहायला मिळत आहे. एकीकडे व्हीआयपी सदस्य आपापला खेळ खेळत आहेत. तर दुसरीकडे, नॉन व्हीआयपी सदस्य व्हीआयपी कंटेस्टंटला जोरदार टक्कर देण्याच्या प्रयत्नात गुंतले आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांत प्रसारित झालेल्या भागांमध्ये व्हीआयपी सदस्यांमध्ये फूट पडताना दिसत आहे. खरं तर बिग बॉसने अलीकडेच ‘टिकीट टू फिनाले वीक’ टास्क दिला. या टास्क अंतर्गत, व्हीआयपी सदस्यांपैकी एका सदस्याला फिनाले वीकचे सदस्य होण्याची संधी देण्यात आली. मात्र, व्हीआयपी सदस्यांना फिनाले वीकमध्ये पोहचवण्याचा पूर्ण अधिकार नॉन व्हीआयपी सदस्यांच्या हातात देण्यात आला. (bigg boss 15 rashami desai called rakhi sawant cheap)

तर अलीकडेच प्रसारित झालेल्या भागामध्ये, हे टास्क आणि याचा परिणाम घेऊन व्हीआयपी सदस्यच एकमेकांना भांडताना दिसले. खरं तर, गेल्या दोन भागांपासूनच व्हीआयपी सदस्यांना दोन गटात विभागलेले दिसून येत आहेत.

यामध्ये राखी, देवोलीना, रितेश आणि अभिजीत एका बाजूला दिसत आहेत. तर दुसरीकडे रश्मी देसाई (Rashami Desai) एकटी चार व्हीआयपी सदस्यांविरुद्ध खेळताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, लेटेस्ट एपिसोडमध्ये राखी, देवोलीना आणि रश्मी यांच्यात जोरदार वाद झाला.

खरं तर, देवोलीना आणि रश्मी यांच्यापासूनच भांडणाची सुरुवात होते. देवोलीना आणि रश्मीची मैत्री गेल्या एपिसोडपासून तुटताना दिसत आहे. दोघेही एकमेकांवर स्वार्थी असल्याचा आरोप करत, जोरदार वाद घालताना दिसल्या.

त्याचवेळी देवोलीना निघून गेल्यावर, राखी रश्मीवर निशाणा साधताना दिसते. राखी म्हणते की, “आम्ही प्लॅनिंग करत असतो, तर तु पण उमरसोबत बसून इशारेबाजी करत असतेस.” राखीचे हे बोलणे ऐकून रश्मीला खूप राग येतो. यानंतर दोघींमध्ये जोरदार वादा झाला. यादरम्यान प्रकरण इतके वाढले की, रश्मी राखीला ‘चीप‘ म्हणाली.

अधिक वाचा –

हे देखील वाचा