टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध शो ‘बिग बॉस १५’चा प्रीमियर झाल्यापासून, हा शो सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये कधी भांडणं, कधी रोमान्स, तर कधी सलमान खानने स्पर्धकांना फटकारल्याच्या बातम्या सतत कानावर येत आहेत. आता या शोच्या नावावर एक नवा वाद उद्भवला आहे आणि तो आहे कॉपी करण्याचा. होय शोवर सेटची डिझाईन कॉपी करण्याचा आरोप लावला जात आहे.
डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दोन फोटो दिसत आहेत. एक फोटो ‘बिग बॉस १५’च्या घराचं आहे आणि दुसरा फोटो फ्लोरिडाच्या टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आहे. या दोन्ही फोटोमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे यातील गुलाबी फ्लेमिंगो. (bigg boss 15 set designer accused of theft omung kumar trolled for copying matthew mazota s pink flamingo)
या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, ‘बिग बॉस १५’च्या घरात दिसणारं गुलाबी फ्लेमिंगो फ्लोरिडाच्या टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फ्लेमिंगोची कॉपी आहे. खरं तर मॅथ्यू माझोटा यांनी विमानतळाचं गुलाबी फ्लेमिंगो तयार केलं आहे. अहवालानुसार हे फ्लेमिंगो ३.९ कोटी खर्च करून बांधण्यात आलं आहे.
ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच, व्हायरल होऊ लागली. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सने ‘बिग बॉस १५’च्या सेट डिझायनरला ट्रोल करायला सुरुवात केली. याशिवाय, टाम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या फ्लेमिंगोचे फोटो देखील मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, यावेळी देखील ओमंग कुमारने बिग बॉसचा सेट तयार केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-ऋता आणि अजिंक्यचा रेड कार्पेटवरील डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड!’
-‘अशक्य सुंदर’, अमृता खानविलकरचा फोटो पाहून चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस
-‘कुछ कुछ होता है अभ्या…’, म्हणत ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षयाने मजेशीर फोटो केले शेअर