Friday, June 26, 2026
Home अन्य ‘बिग बॉस १५’मध्ये शमिता शेट्टीची जबरदस्त एन्ट्री; राकेश बापटचे नाव घेत सलमान खान म्हणाला….

‘बिग बॉस १५’मध्ये शमिता शेट्टीची जबरदस्त एन्ट्री; राकेश बापटचे नाव घेत सलमान खान म्हणाला….

टीव्हीचा बहुप्रतिक्षित शो ‘बिग बॉस १५’ दणक्यात सुरू झाला आहे. ‘बिग बॉस १५’चा ग्रँड प्रीमियर रविवारी झाला आणि’ बिग बॉस ओटीटी’चे फायनललिस्ट शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांनी शोमध्ये प्रवेश केला. होस्ट सलमान खानने त्यांच्याशी संवाद साधला आणि विचारले की, त्यांनी शोसाठी काय तयारी केली आहे. तिघांनीही त्याला उत्तर दिल्यानंतर सलमानने त्यांचा ‘बिग बॉस ओटीटी’चा प्रवास स्क्रीनवरील तीन स्पर्धकांना स्टेजवर दाखवला. पहिल्यांदा शमिता आणि निशांतच्या भांडणाचे व्हिज्युअल्स दाखवले आणि नंतर सलमानने शमिताच्या भांडणाची खिल्ली उडवली. सोबतच सलमान खानने तिला तिच्या अनुभवाबद्दलही विचारले.

सलमान खान म्हणाला की, तिची (शमिता) बहीण शिल्पा शेट्टीने ‘बिग ब्रदर’ जिंकला आणि दुसऱ्या सीझनचे होस्टिंगही केले. त्याने शमिताला या सीझनमध्ये मुक्तपणे खेळण्यास सांगितले. सलमानने शमिताला तिच्या ‘बिग बॉस ओटीटी’ कनेक्शन राकेश बापटच्या नावाने चिडवले देखील. सलमानच्या या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर शमिता म्हणाली की, प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम आणि आदर पाहून ती खूप आनंदी आहे.

शमिता शेट्टी पुढे म्हणाली की, “विजेते आणि फायनलिस्टच्या जवळ उभे राहून स्वतःला पाहणे तिला वाईट वाटले.” ती म्हणाली की, “बिग बॉस ओटीटी केल्याच्या सहा आठवड्यांत त्यांना मिळालेली मान्यता आणि लोकप्रियता त्यांनी केलेल्या चित्रपटांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. यानंतर सलमान खानने तिला घरात एन्ट्री करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.”

याशिवाय होस्ट सलमानने निशांत आणि प्रतीक सहजपाल यांना ‘बिग बॉस ओटीटी’चे व्हिज्युअल्स दाखवले. निशांत आणि प्रतीक या व्हिज्युअल्समध्ये खूप चांगले मित्र म्हणून दिसतात. व्हिज्युअल्स दाखवल्यानंतर सलमान खानने त्यांना विचारले की, ते या सीझनमध्ये मित्र राहतील का? ज्याला प्रतीकने सांगितले की, शो दरम्यान आणि बाहेर त्यांची मैत्री घट्ट झाली. पण ‘बिग बॉस १५’च्या घरात मैत्री असेल की, नाही हे सांगणे कठीण आहे. तो त्याचा खेळ खेळेल. येथे ‘बीबी ओटीटी’ मध्ये झालेल्या चुका पुन्हा करणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अंमली पदार्थ प्रकरणात आर्यन खानला अटक, किंग खानला भेटण्यासाठी भाईजान पोहोचला ‘मन्नत’ला

-दिशा पटानीने शेअर केला तिचा ‘असा’ दिलकश फोटो, अदा पाहून स्वत:ला रोखू शकला नाही टायगर श्रॉफ

-तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले तिचे वेगवेगळे मूड, फोटो पाहून स्वप्नील जोशी म्हणतोय…

हे देखील वाचा