Thursday, July 18, 2024

ज्योतिषाची भविष्यवाणी होणार का खरी? ‘या’ व्यक्तीसोबत लग्न करून शमिता शेट्टीला होणार दोन मुलं

‘बिग बॉस १५’ मध्ये रविवारच्या एपिसोडमध्ये ज्योतिष आले होते. यावेळी त्यांनी घरातील सदस्यांबाबत भविष्यवाणी केली. त्यांनी शमिता शेट्टीबाबत देखील भविष्यवाणी केली. त्यांनी अभिनेत्रीचे लग्न आणि मुलं याबाबत सांगितले. ज्योतिषाने असे सांगितले की, शमिताचे लग्न कोणत्याही मोठ्या स्टारसोबत नाही, तर एका सामान्य व्यक्तीसोबत होणार आहे. यानंतर ती याबाबत प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्टसोबत बोलते की, या वर्षी ती नक्कीच लग्न करणार आहे.

ज्योतिषाने असे सांगितले होते की, “तुझे लग्न श्रीमंत नाही तर एका सामान्य व्यक्तीसोबत होणार आहे.” त्यांनी हे देखील सांगितले की, शमिताचा पती लग्नानंतर जास्त पैसा कमावणार आहे. तसेच तिला दोन मुलं होणार आहे. तिला एक मुलगा आणि एक मुलगी होणार आहे. (Bigg boss 15, Shamita Shetty says she will marry this year)

प्रतीक शमिताला शुभेच्छा देत असतो. त्यावेळी ती म्हणते की, “मी या वर्षी लग्न करेल पण मुलगा कोण आहे हे सांगा.” यावर प्रतीक म्हणतो की, “तू खरंच २०२२ मध्ये लग्न करणार आहेस?”

यानंतर निशांत शमिताला समजावत असतो की, तिने घाई नाही केली पाहिजे. तसेच तिला सांगतो की, राकेश बापट बाबत घाईने कोणताही निर्णय घेऊ नकोस. यावर शमिता म्हणते की, “मी त्याला नाही ओळखत शो मध्ये आल्यावर मी त्याला ओळखायला लागले.”

एवढंच नाही, तर शमिता म्हणते की, “तो माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे.’ बिग बॉस ओटीटी दरम्यान शमिता आणि राकेश खूप जवळ आले होते. तसेच हा शो संपल्यानंतर ते बाहेर लंच डेटवर देखील गेले होते. परंतु आता शमिताला त्याच्याबाबत आधी सारखी आपुलकी वाटत नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा