Wednesday, July 3, 2024

धक्कादायक! ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होण्यापूर्वीच ‘या’ स्पर्धकाला पॅनिक अटॅक; सुरू होण्यापूर्वीच सोडला शो

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. ‘बिग बॉस’ या शोची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. कदाचित त्यामुळेच या शोचे आतापर्यंत १४ पर्व झाले आहेत. तसेच शोचे १५ वे पर्वही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’ सध्या भलतेच चर्चेत आहे. या शोशी संबंधित काही प्रोमोही प्रदर्शित झाले आङेत. या प्रोमोमध्ये ‘बिग बॉस १५’मध्ये सामील होणाऱ्या स्पर्धकांची झलकही पाहायला मिळाली आहे. या प्रोमोत प्रसिद्ध गायिका अफसाना खानही दिसली आहे. अफसानाने ‘तितलिया वरगा’ गाणे गाऊन प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र, तिच्याबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, अफसाना खानने सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस १५’ शो सोडला आहे. हा शो पुढील महिन्यात म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, शो सुरू होण्यापूर्वीच अफसानाने हा शो सोडला आहे. खरं तर, या शोमध्ये सामील होण्यासाठी अफसानाला मुंबईच्या एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. सोमवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी अफसानाला पॅनिक अटॅक आला. (Bigg Boss 15 Titliya Warga Singer Afsana Khan Leave Salman Khan Show She Face Panic Attack Before Enter)

यानंतर लगेचच ‘बिग बॉस १५’च्या निर्मात्यांच्या वैद्यकीय पथकाने तिची देखरेख केली. आता असे वृत्त समोर आले आहे की, अफसानाने मंगळवारी (२८ सप्टेंबर) सकाळी मुंबई शहर सोडले आहे. तसेच ती सलमान खानच्या या शोचा भाग बनू शकणार नाही. नुकतेच मध्यप्रदेशमध्ये ‘बिग बॉस १५’ची पत्रकार परिषद झाली होती. यामध्ये ४ स्पर्धकांच्या नावाचा खुलासा करण्यात आला होता, ज्यांची या पर्वात शोमध्ये एन्ट्री होणार आहे.

यानंतर या शोचा भाग होणाऱ्या आणखी ४ कलाकारांची नावे समोर आली होती. मागील काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक प्रोमो प्रदर्शित केला होता, ज्यामध्ये चारही कलाकारांची झलक पाहायला मिळाली होती, तरीही कोणत्याही कलाकाराचा चेहरा दिसत नव्हता. प्रोमोमध्ये एक जंगल दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये तेजस्वी प्रकाश बॅग घेऊन फिरताना दिसली होती. दुसरीकडे करण कुंद्रा आणि सिंबा नागपाल निशाणा लावताना दिसत होते. यानंतर ‘तितलिया वरगा’ गाण्याची गायिका अफसाना खानचीही एक झलक पाहायला मिळाली होती.

पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, ‘बिग बॉस १५’मध्ये ‘बिग बॉस १३’चा रनरअप आसिम रियाजचा मोठा भाऊ उमर रियाज, टीव्ही अभिनेत्री सोनल बिष्ट, अभिनेत्री आणि ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट दिसणार आहेत. या कलाकारांव्यतिरिक्त ‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक प्रतीक सहजपालही शोमध्ये दिसेल, हे आधीच निश्चित झाले होते. सोबतच गायिका अकासा सिंगही ‘बिग बॉस १५’चा भाग आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल

-‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

हे देखील वाचा