Wednesday, July 2, 2025
Home अन्य Bigg Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

Bigg Boss 15: शोमध्ये सहभागी होणाऱ्या ‘या’ पाच स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब

टीव्हीवरील सर्वात चर्चित, लोकप्रिय आणि वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ या शोला ओळखले जाते. दरवर्षी टीव्हीवरच्या कलाकारांसह हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. यावर्षी या शोचा १५ वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणे यावर्षी या शोमध्ये कोणकोणते कलाकार सहभागी होणार आहेत, यावर प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे.

नुकताच ‘बिग बॉस ओटीटी’ संपला आहे आणि आता प्रेक्षक ‘बिग बॉस १५’ची वाट पाहत आहेत. सलमान खानचा हा शो २ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. शोबाबत सतत वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. दरम्यान गुरुवारी (२३ सप्टेंबर) ‘बिग बॉस’च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आता याच्याशी संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत. (bigg boss 15 two contestants name confirmed for salman khan show)

व्हिडिओ कॉलद्वारे सलमान खानने यात सहभाग घेतला, तर देवोलीना भट्टाचार्य आणि आरती सिंगने याला होस्ट केले. या दरम्यान, खूप मजामस्ती देखील पाहायला मिळाली. पत्रकार परिषदेचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, या दरम्यान ‘बिग बॉस १५’च्या काही स्पर्धकांची नावे कन्फर्म करण्यात आली आहेत.

https://www.instagram.com/p/CULH5buschm/?utm_source=ig_web_copy_link

‘ही’ दोन नावे झाली कन्फर्म
या पत्रकार परिषदेत दोन स्पर्धकांची नावे उघड झाली. आसीम रियाजचा भाऊ उमर रियाज आणि अभिनेत्री डोनल बिष्टही या शोचा भाग असतील. दोघेही व्हिडिओ कॉलद्वारे या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले होते.

‘बिग बॉस ओटीटी’चे ३ स्पर्धक
उमर रियाज आणि डोनल बिष्ट यांच्या व्यतिरिक्त ‘बिग बॉस ओटीटी’चे ३ स्पर्धक देखील या शोमध्ये सहभागी होतील. या तीन स्पर्धकांमध्ये प्रतीकने आधीच ‘बिग बॉस १५’ ची निवड केली होती. तर आरती आणि देवोलीनाने घोषणा केली की, शमिता शेट्टी आणि निशांत भट्ट हे देखील ‘बिग बॉस १५’ चा भाग असतील.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी’मध्ये पाहायला मिळाला सोनाली पाटीलचा कोल्हापुरी रांगडा बाज; केली ‘या’ स्पर्धकांची नक्कल

-‘सांग काम्या हो नाम्या’ कार्यात महिलांचे नखरे पुरवताना पुरुषांच्या नाकी नऊ, तर जय दुधानेला आले रडू

-‘…आणि आम्ही हो म्हणालो,’ अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी चाहत्यांना दिली ‘ही’ गोड बातमी

हे देखील वाचा