Wednesday, July 3, 2024

‘बिग बॉस १५’च्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आले समोर, टीव्हीची ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री घेणार सहभाग

टीव्हीचा सर्वात मोठा वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ सध्या वूट सिलेक्टवर प्रसारित होत आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी सुरू झालेला ‘बिग बॉस ओटीटी’ सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. पण आता ‘बिग बॉस ओटीटी’ लवकरच संपणार आहे. त्याचबरोबर ‘बिग बॉस १५’ सुरू होणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ करण जोहर होस्ट करत आहे. तर ‘बिग बॉस १५’ मागील अनेक सीझनप्रमाणे सलमान खान होस्ट करणार आहे. शो कोणत्या तारखेपासून सुरू होईल याची अजूनही अधिकृत घोषणा केली नाही. परंतु पुढील काही दिवसांमध्ये सलमान खान टीव्हीवर एंट्री करेल अशी अपेक्षा आहे.

त्याचबरोबर ‘बिग बॉस’ शी संबंधित एक नवीन माहिती नुकतीच समोर आली आहे. सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणाऱ्या पहिल्या स्पर्धकाचे नाव आता सर्वांसमोर आले आहे. त्या स्पर्धकाचे नाव रीम शेख असे आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रीम शेख यावर्षी शोमध्ये दिसणार आहे. रीम शेख एक सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. ‘वो न बोले तुम ना मैंने कुछ कहा’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’, ‘तू आशिकी’ आणि ‘तुझसे है राब्ता’ या मालिकेमध्ये रीम दिसली होती. आता माध्यमांतील वृत्तानुसार, लवकरच रीम ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसणार आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, एक सूत्राने सांगितले की, “या शोच्या मेकर्सला मागील काही दिवसांपासून रीमला शोमध्ये आणण्याची खूप इच्छा होती. पण ती ‘तुझसे है राब्ता’ ही मालिका करत होती. त्यामुळे तिने ‘बिग बॉस’मध्ये भाग घेण्यास जास्त रस दाखवला नाही. पण आता ती मालिका संपली आहे. त्याचबरोबर रीमने देखील ‘बिग बॉस’मध्ये येण्यास सहमती दर्शवली आहे. रीम सोशल मीडियाचा सुप्रसिद्ध चेहरा आहे. तिचे इंस्टाग्रामवर ४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

याचबरोबर आता पुढील स्पर्धक कोण असतील हे देखील पाहणे महत्वाचे आणि उत्सुकतेचे असेल.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या सेटवर एन्जॉय करताना दिसले ‘ही मॅन’; चहा पित म्हणाले, ‘चीयर्स!’

-‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

-रवी तेजा ईडीच्या कार्यालयात हजर, मनी लॉन्ड्रिंगसह ‘या’ प्रकरणीही करण्यात आली चौकशी

हे देखील वाचा