Monday, July 1, 2024

एकता कपूरची नागिन पहिल्यांदाच महामारीशी लढणार, पाहा तेजस्वी प्रकाशचा किलर लूक

बिग बॉसचा १५ वा सीझन पूर्ण झाला आहे. रविवारी (३० जानेवारी) बिग बॉसचा ग्रँड फिनाले झाला. त्याचवेळी बिग बॉस १५ ट्रॉफीवर शोची बबली मेंबर असलेल्या तेजस्वी प्रकाशने आपले नाव कोरले. आता तिच्याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. कलर्स टीव्ही शो नागिनला त्याच्या पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या फॅन्टसी फिक्शन शो ‘नागिन’च्या सहाव्या सीझनची घोषणा झाल्यापासून देशभरातील चाहते नवीन नागिन दिसण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे कारण ‘नागिन ६’ मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव समोर आले आहे.

एकता कपूरच्या ‘नागिन ६’ मध्ये ‘बिग बॉस १५’ची विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘बिग बॉस १५’मध्ये तिच्या खेळाने सर्वांना भुरळ पाडल्यानंतर आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी आता नागिन बनून सर्वांचे होश उडवण्यासाठी सज्ज आहे. यासोबतच बिग बॉसमधील सह-स्पर्धक असलेली सिंबा नागपालही ‘नागिन ६’मध्ये दिसणार आहे.

समोर आला नागिनचा किलर लूक

बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या वेळी सलमान खानने तेजस्वीच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल बोलताना ‘नागिन ६’मधील तिच्या पात्राची घोषणा केली. यानंतर नागिन बनलेल्या तेजस्वीनेही जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला. नागिनच्या भूमिकेतील तेजस्वीचा लूक किलर दिसत आहे.

Naagin 6: Tejasswi Prakash CONFIRMED to play the lead role in Ekta Kapoor's  show?

शोमध्ये नागिन महामारीशी दिसणार लढताना

एकता कपूरच्या नागिन शोच्या ६ व्या सीझनमध्ये नागिन राणी म्हणजेच ‘सर्वश्रेष्ठ नागिन’ मानवतेच्या अस्तित्वासाठी धोकादायक बनलेल्या व्हायरसशी लढताना दिसणार आहे. अलीकडेच, शोचा प्रोमो देखील कलर्स टीव्हीने प्रदर्शित केला होता. ज्यानंतर युजर्सने ‘नागिन ६’च्या कथेबद्दल प्रचंड ट्रोल केले होते.

शोमध्ये पुन्हा दिसणार जुने चेहरे

‘नागिन ६’मध्ये पुन्हा एकदा जुने कलाकार धमाल करताना दिसणार आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, सुधा चंद्रन, उर्वशी ढोलकिया आणि मेहक चहल यांच्या एकत्रित कलाकारांसह ‘नागिन’चा हा सीझन लवकरच कलर्सवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा