Saturday, July 6, 2024

Bigg Boss 15: बाथरूममध्ये आंघोळ करत होती ‘ही’ स्पर्धक, जेव्हा प्रतीकने तोडलं दरवाजाचं कुलूप; पुढं जे झालं…

‘बिग बॉसचा १५’ वा सीझन दणक्यात सुरू झाला आहे. काही स्पर्धक घराच्या जंगलामध्ये राहत आहेत. या दरम्यान, घरात दोन रोमँटिक जोडपी देखील आहेत. एका बाजूला मायशा अय्यर आणि इशान सहगल आहेत आणि दुसरीकडे उमर रियाज आणि तेजस्वी प्रकाश यांच्यामध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर घरात जबरदस्त ड्रामाही पाहायला मिळणार आहे. आगामी भागांमध्ये, विधी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना प्रतीक सेहजपाल कुलूप तोडण्याचा प्रयत्न करताना दिसेल.

प्रतीकने तोडले बाथरूमचे कुलूप
प्रतीकने ही गोष्ट केल्यानंतर विधी बाहेर आली आणि खूप चिडली. या घटनेनंतर करण कुंद्रा आणि उर्वरित स्पर्धक सर्व सदस्य विधीसोबत असतील आणि प्रतीकला सर्वांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. प्रोमोच्या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, विधी बाहेर येते आणि म्हणते की, त्याने कुलूप तोडले आहे. यानंतर विधी प्रतीकला म्हणाली, ‘आत कोणी आंघोळ करत असताना तू हे का करतोस?’ या दरम्यान, करण संपूर्ण वेळ विधीचे समर्थन करताना दिसेल.

बिग बॉस सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. एक जो घराच्या आत आहे, तर काही लोक आहेत जे घराबाहेर जंगलात राहतात. कुटुंबातील सदस्य आणि जंगलवासी यांच्यात भयंकर लढाई होत आहे आणि दोघेही एकमेकांसाठी समस्या निर्माण करत आहेत. या सगळ्या दरम्यान, प्रतीक सहजपालने आंघोळ करत असताना विधीला घाबरवण्यासाठी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला.

समर्थनही केले आणि फटकारले
सुरुवातीला विधीला वाटले की, कदाचित ही तिची कल्पना असेल पण नंतर तिला जाणवले की, कोणीतरी बाहेरून काहीतरी बोलत आहे, ज्याचा आवाज येत आहे. हा प्रतीक सेहजपाल आहे, हे समजल्यावर ती बाहेर आली आणि त्याला खडसावले. जेव्हा संपूर्ण गोष्ट समजली तेव्हा तिचे सर्व सहकारी स्पर्धकही तिच्या समर्थनासाठी आले. विधी म्हणाली की, “प्रतिकचा हेतू चुकीचा नव्हता. पण त्याने तसे करायला नको होते.” हा प्रोमो पाहून असे वाटते की, आगामी एपिसोड बराच रंजक असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात

-‘हिंदी मीडियम’ फेम सबा कमरला मशिदीत डान्स करणं पडलं महागात, पाक कोर्टाने दाखल केली एफआयआर

-शमिता शेट्टीला ‘आंटी’ म्हणणे करण कुंद्राला पडले महागात, अभिनेत्रीच्या आईने केली कानउघडणी

हे देखील वाचा