Friday, July 5, 2024

मराठी माणूस! साेप्पा नव्हता शिवचा प्रवास करिअरच्या सुरुवातीला विकायचा दूध अन् न्यूज पेपर

छाेट्या पडद्यावरील लाेकप्रिय आणि वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘ चा स्पर्धक शिव ठाकरे पहिल्या दिवसापासून खूप चांगला खेळत आहे. त्याच्या खेळाचे सलमान खाननेही कौतुक केले आहे. बिग बॉसपूर्वी, शिव एमटीव्हीच्या  रोडीजमध्येही दिसला हाेता. रोडीजमध्ये असताना शिवने त्याच्या स्वभावाने सर्वांची मने जिंकली. बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून दिसणारा शिव ठाकरे मराठी बिग बॉसचा विजेता आहे. पण तुम्हाला माहित आहे इथपर्यंत येण्यासाठी शिवला अनेक संकटांना सामाेरे जावे लागले. चला, तर जाणुन घेऊया शिव ठाकरेचा आतापर्यंतचा प्रवास…

‘बिग बॉस 16’मध्ये शिव ठाकरे आपल्या खास स्टाइलने बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालत आहे. पहिल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमानने शिवच्या खेळाचे खूप कौतुक केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिव रोडीजमध्येही दिसला होता 
शिव ठाकरे बिग बॉसच्या आधी टीव्ही शो रोडीजमध्ये स्पर्धक म्हणून दिसला हाेता. रोडीजमध्येही तो स्ट्राँग स्पर्धक होता. ऑडिशन राउंडमध्येच करण कुंद्राला शिवाचा साधेपणा आवडला. शिवाचे स्टाेर ऐकुण रणविजय सिंग खूप भावूक झाले हाेते.ऑडिशन राऊंडमध्ये शिवने सांगितले होते की, “पूर्वी त्याचे घर झोपडपट्टीत होते. नंतर त्यांनी तेथून घर बदलले.”

शिव जायचा वर्तमानपत्र विकायला 
शिवने आपल्या करिअरच्या या टप्प्यावर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. त्याने सांगितले हाेते की, “त्याच्या वडिलांचे पानाचे दुकान आहे, तिथे ताे देखील काम करायचा.” शिवने पुढे सांगितले की,”तो त्याच्या बहिणीसोबत वर्तमानपत्र विकायला जायचा, दुधाची पाकिटे विकायचा. यानंतर त्याने डान्स क्लासेस चालवायला सुरुवात केली आणि 10 ते 22 हजार रुपये कमवू लागला.” डान्स क्लास दरम्यान शिवने बॉडीही बनवली. शिवची ही हृदयस्पर्शी कथा ऐकून टीम लीडर खूपच प्रभावित झाले हाेते.

शिव त्यांच्या मेहनतीमुळेच आज इथपर्यंत पोहोचला आहे. रोडीजप्रमाणेच बिग बॉस 16 मधील शिवाचे कामही लोकांनच्या पसंतीस उतरले आहे. चाहते त्याचा खेळ पसंत करत आहेत, त्याला पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर शिव बिग बॉस 16 चा विजेतेपद पटकावणार का हे पाहणे रंजक ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कसलं भारी! क्रिकेटनंतर बाॅलिवूडमध्ये धुमाकूळ घालणार शिखर धवन, हुमा कुरैशीसाेबत करणार राेमान्स

शुभ मंगल सावधान! कियारा अन् सिद्धार्थ पुढच्या वर्षी या महिन्यात अडकणार लग्न बंधनात

हे देखील वाचा