Tuesday, June 18, 2024

साजिद खानसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर बोलताना सौंदर्या म्हणाली, “ते नेहमीच माझ्यासाठी…’

बिग बॉस १६ च्या पर्वातील सर्वच स्पर्धकांना तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस संपल्यानंतर देखील या शोमधील स्पर्धक या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत आहे. सध्या मीडियामध्ये आणि ग्लॅमर जगात गाजते ती अभिनेत्री सौंदर्या शर्मा. शोमधून बाहेर आल्यानंतर सौंदर्या सतत लाइमलाईट्मधे आहे. कधी ती कोणासोबत पार्टी करताना दिसते तर कधी ती तिच्या अफवांमुळे लक्ष वेधून घेते. सौंदर्याने तिच्या बिग बॉसच्या घरातील वावरामुळे लोकांच्या मनात चांगलेच स्थान निर्माण केले आहे. मात्र सध्या ती दिग्दर्शक साजिद खानमुळे चांगलीच गाजत आहे. साजिद खान आणि तिच्यात अफेयर चालू असल्याच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. तिला सतत यावर प्रश्न विचारण्यात येत आहे. त्यामुळे आता तिने यासर्व गोष्टींवर भाष्य केले आहे.

तर झाले असे की, सोशल मीडियावर साजिद खान आणि सौंदर्या शर्मा यांचा एक फोटो व्हायरल झाला अन त्यांच्या अफेयरच्या चर्चाना सुरुवात झाली. सौंदर्या बिग बॉसच्या घरात अभिनेता गौतम विगसोबतच्या नात्यामुळे आणि तिच्या लुक्समुळे चांगलीच गाजली. तर साजिद खान मंडळीसोबतच दिसायचा. शोमध्ये हे जरी दोन वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते, तरी त्यांच्यात एक चांगला बॉंड होता. मात्र आता त्यांच्या अफेयरच्या बातम्यांवर सौंदर्याने नाराजी व्यक्त करी सर्व बातम्यांना अफवा म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajid Khan (@aslisajidkhan)

एका मुलाखतीमध्ये सौंदर्याने या गोष्टीवर सांगितले की, “साजिद खान यांच्यासोबत माझे नाव जोडले जात असल्याचे पाहून आणि ऐकूनच मी दुःखी झाले आहे. ते नेहमीच माझ्यासाठी एक भाऊ, मित्र म्हणून होते आणि आहे. आजही एखाद्या महिलेचे नाव एखाद्या व्यक्तीसोबत जोडले जाते आणि तुला त्यावरून बोलले देखील जाते. हे पाहूनच मी हताश झाली आहे. आम्ही कोणाला डेट करतो किंवा कोणासोबत नात्यात आहोत या दृष्टीने इतक्या छोट्या विचारांनी लोकांनी आम्हाला बघणे बंद केले पाहिजे नक्कीच ती वेळ आता आली आहे.”

तर आता साजिद खानने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व बातम्यांमुळे तो दुखी असून, असे अफेयरच्या बातम्या पसरवणे चुकीचे असल्याचे त्याने सांगितले आहे. सौंदर्या त्याच्या लहान बहिणीसारखी असल्याचे देखील तो यावेळी म्हणाला. तत्पूर्वी सौंदर्या साजिद खानच्या सिनेमात दिसू शकते किंवा एका गाण्यात दिसू शकते असे सांगितले जात आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थँक गॉड’मदेह तिने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

हे देखील वाचा