टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सर्वात विवादित शो म्हणून बिग बॉस शो ओळखला जातो. या शोच्या प्रत्येक पर्वामध्ये काहींना काही असे घडते ज्यावरून शोचा चालू सिझन तुफान गाजतो. यावर्षी बिग बॉसचा १६ वा सिझन चालू आहे. या सीझनमध्ये मनोरंजनविश्वातील अनेक नामी आणि मोठ्या सेलेब्रिटी पाहायला मिळत आहे. याच पर्वातील स्पर्धक असलेला अभिनेता अंकित गुप्ता बऱ्यापैकी चर्चेत असलेला स्पर्धक होता. त्याचे आणि प्रियांकाचे घरातील नाते खूपच गाजले. मात्र असे असूनही अंकित शोमध्ये जास्त काही करू शकला नाही. तरीही त्याला भरभरून मतं मिळत गेली आणि त्याने बरेच आठवडे घरात काढले मात्र अखेर तो बाहेर पडला. घरातून बाहेर आल्यानंतर त्याने त्याच्या फॅन्सला पाठिंबा देण्यासाठी धन्यवाद म्हटले. आता अंकितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यात तो पार्टीमध्ये मस्ती करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे त्याचे घरातील रूप आणि त्या व्हिडिओमधले रूप पाहून नेटकऱ्यांना आश्चर्य वाटत आहे.
View this post on Instagram
बिग बॉस १६च्या एका फॅन पेजवर अंकित गुप्ताचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अंकित एका क्लबमध्ये पार्टी करत असून, हात वर करून दणक्यात नाचताना दिसत आहे. त्याच्यासोबतच बिग बॉसच्या १६ व्या पर्वातील स्पर्धक गौतम देखील दिसत असून तो हातात ड्रिंक्स घेऊन अंकितच्या मागे उभा आहे. अंकितचे हे रूप पाहूच सर्वच लोकं हैराण आहे. अनेकांनी तर कमेंट्समध्ये विचारले देखील जर हा अंकित आहे तर बिग बॉसमध्ये कोण होता? काहींनी तर प्रियंकाला ट्रोल केले तर काहींनी त्याने ड्रिंक्स घेतल्यामुळे तो असा वागत असल्याचे सांगितले.
यायाधी देखील अंकितचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ज्यात अंकित एका हॉटेल रुममध्ये एका मुलीसोबत दिसला. त्या रूममध्ये तो एका मीडिया हाऊसला मुलाखत देत असताना ती मुलगी त्याच्या मागे बसलेली होती. त्यानंतर त्याने खुलासा केला की ती मुलगी त्याची मॅनेजर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार