‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय, पण तितकाच वादग्रस्त शो आहे. या शोमध्ये दरदिवशी बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरूच असते. हे आता सामान्य झाले आहे. विशेष म्हणजे, या घरात जिगरी मित्रही क्षणात भांडताना दिसतात. अशात वीकेंडच्या वारमध्ये शोचा होस्ट सलमान खान पुन्हा एकदा घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसला. या एपिसोडच्या सुरुवातील सामान्य नागरिक घरातील सदस्यांना प्रश्न विचारताना दिसली. लोकांनी शालीन आणि टीनाच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले. मात्र, सलमान एका सदस्यावर भलताच चिडला.
वीकेंडच्या वारमध्ये अर्चना गौतमवर सलमान खान (Salman Khan) संतापला. तो तिच्यावरच सर्वात जास्त नाराज दिसला. तसेच, तिच्यावर आगपाखडही केली. सुंबुल आणि शालीनच्या चेहऱ्याबद्दल बोलल्यामुळे सलमानने अर्चना गौतम (Archana Gautam) हिच्यावर राग व्यक्त केला. सलमान अर्चनाला म्हणाला की, “तुझं खूप झालंय अर्चना… स्वत:ला काय समजतेस?” यानंतर तिने सलमानला सांगितले की, ती पुन्हा असे करणार नाही. यानंतर सलमान म्हणाला की, “तू हवेत खूप वर उडतेय.”
View this post on Instagram
मात्र, पुढील एपिसोड आणखी मजेशीर होता. यामध्ये सलमानने घरातील सदस्यांना नवीन टास्क दिला. या टास्कमध्ये सर्व स्पर्धकांना कोणत्याही एका सदस्याचे नाव घेत सांगायचे होते की, त्यांना त्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढायचे आहे का? यानंतर त्या स्पर्धकाचा फोटो फुटबॉलवर लावून किक मारायची होती. या टास्कमध्ये सर्वाधिक लोक शालीनचा फोटो फुटबॉलवर लावून किक करताना दिसले.
View this post on Instagram
खरं तर, मागील काही दिवसांपासून अर्चना घरातील सदस्यांना असे काही बोलत होती, जे वादग्रस्त होते. नुकतेच तिचे भांडण शालीन आणि सुंबुलशी झाले होते, ज्यात तिने दोघांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, सलमानकडून ओरडा खाल्ल्यानंतर अर्चनाने तिची चूक मान्य करत पुन्हा असे काहीही न करण्याचे वचन दिले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘भेडिया’वर 16व्या दिवशीही ‘दृश्यम 2’ भारीच, आयुष्मानचा ‘ऍन ऍक्शन हिरो’ खातोय गटांगळ्या
जेव्हा शशी कपूरांनी शर्मिला टागोर यांची केलेली मस्करी; म्हणाले होते, ‘जेनिफर तुझ्याकडे दुधाचे पैसे…’










