Monday, December 22, 2025
Home अन्य लाफ्टर क्वीन अर्चनाच्या अवाजावर कश्मिरा शाहने उडवली खिल्ली; म्हणाली,’हिचा आवाज फक्त जनावर…’

लाफ्टर क्वीन अर्चनाच्या अवाजावर कश्मिरा शाहने उडवली खिल्ली; म्हणाली,’हिचा आवाज फक्त जनावर…’

लेकप्रिय कॉमेडिय आणि अभिनेता कृष्णा अभिषेक याची पत्नी कश्मीरा शाह हिनेही बॉलिवूडमधील अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. तिने चित्रपटामध्ये नेहमी साहायक भूमिका निभावल्या आहेत. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने बिग बॉसमधील एका स्पर्धकावर टीका करत ट्वीट केले आहे. त्यामुळे तिला ट्रेलिंगचा सामना करावा लागत आहे.

कश्मीरा बिग बॉसचा प्रत्येक सिजन आवर्जून बघत असते. त्यामुळे बिग बॉसमधील प्रत्येक स्पर्धकावर आपले मत मांडत असते. एवढेच काय तर तिने बिग बॉसच्या घरामध्ये येऊन त्यांना आरसाही दाखवला आहे. मात्र, यावेळेस तिने बिग बॉसमधील एका स्पर्धकाला निशाण्यावर धरले आहे. तिने बिग बॉसची लाफ्टर क्वीन अर्चना गौतमला तिच्या आवाजावरुन टिका केली आहे. तिने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन अर्चनाला नको ते ऐकवले आहे. मात्र, त्यामुळे अर्चनाच्य चाहत्यांनीही कश्मिराला सोडले नाही. तिच्या चाहत्यांनीही तिला ट्रोल केले आहे.

कश्मिराने अर्चनाच्या आवाजवरुन तिचा मजाक उडवत सोसल मीडियावर ट्वीट केले आहे. तिने ट्वीट करत लिहिले की, आजच्या भागाला पाहून मी शपथ खात आहे की, भले अर्चना मला आवडत असली तरीही मला वाटत आहे की, तिचा अल्ट्रासॉनिक आवाज फक्त जनावर एकू शकतात. कश्मिराच्या अशा ट्वीटमुळे अर्चनाचे चाहते खूपच भडकले आहेत. कितीतरी लोकांनी तिला धडा शिकवला. तिच्या ट्वीटवर अनेकांनी आपली नारजी व्यक्त केली आहे.

एका युजरने रिट्वीट करत लिहिले की, स्वत:चा आवाज ऐकलास का कधी? दुसऱ्या जुजरने लिहिले की, ती तुझ्यापेक्षा 10 गुणांनी चांगली स्पर्धक आहे.अजून एकाने लिहिले की, ती तुझ्यापेक्षा चांगलीच आहे. अजून एका अन्यने लिहिले की, हे बॉडी शेमिंगवर आवाज उठवणारे लोक आज वॉइस शेमिंग… हे नॅचरली नाही बदलू शकत… एवढा दिमाग नाही का? याशिवाय अनेक लेकांनी तिच्यावर टीका करत तिला धडा शिवकवला. पाहायला गेलं तर कश्मिराही बिग बॉसची स्पर्धक होऊन गेली आहे, त्यामुळे ती या कारयक्रमाच्या प्रत्येक हालचालिवर आपली प्रतिक्रिया देत असते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
इंडस्ट्रीत10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आलियाची पोस्ट; म्हणाली, ‘मी अजून चांगली कलाकार…’
प्रियंका आणि अंकितची लव्हस्टोरी झाली सुरु; अभिनेत्री म्हणाली, ‘तुझ्याशी प्रेम करणं सोडून देऊ…’

हे देखील वाचा