Saturday, June 29, 2024

निमृत कौर फिनालेच्या काही दिवस आधी बिग बॉसमधून बाहेर, मंडळींमधील अजून एक सदस्य कमी

सध्या बिग बॉसचे १६ वे पर्व त्याच्या अंतिम पडावात पोहचले आहे. लवकरच या पर्वचाच विजेता जाहीर होणार असून, त्याआधी घरात अतिशय रंजक आणि अविश्वसनीय गोष्टी घडताना दिसत आहे. बिग बॉस चे १६ वे पर्व चांगलेच गाजले आणि त्यामुळे या पर्वाला काही दिवसांची वाढीव मुदत देखील मिळाली. आता मात्र शोमध्ये विविध भन्नाट ट्विस्ट येत असून अनेक दमदार कलाकार घरातून बाहेर पडत आहे. नुकतेच या शोमधून अभिनेत्री निमृत कौर बाहेर पडली आहे.

आठवड्याच्या मधेच अचानक निमृत कौर अहलुवालिया घरातून बाहेर पडली. जनतेच्या लाइव्ह मतांच्या कमतरतेमुळे तिला घरातून बाहेर पडावे लागले. निमृत तब्बल १८ आठवडे घरात होती. ती या शोची पहिली आणि शेवटची कॅप्टन होती. मागील आठवड्यात ती तिकीट टू फिनाले हे जिंकण्यात देखील यशस्वी झाली होती. नुकत्याच झालेल्या भागात घरामध्ये काही दर्शकांची एन्ट्री झाली. त्यानंतर बिग बॉसने सर्वांना सांगितले की, या नवीन टास्कमधून पाच फायनॅलिस्ट मिळणार आहे. यासाठी बिग बॉसने सर्वांना टास्कचे नियम देखील सांगितले. त्यांनी सांगितले की, सर्वांना दर्शकांसमोर मतं मागावे लागतील. यादरम्यान बिग बॉसने स्पर्धकांना निवडणुकीचे चिन्ह देखील दिले. या टास्कमध्ये सर्वांना त्याचे म्हणणे लोकांसमोर ठेऊन मतं मागायची होती.

यानंतर बिग बॉसने सर्व सदस्यांना घराच्या लिविंग भागात बोलावले. बिग बॉसने सांगितले की जनतेने पाच सदस्यांची निवड केली असून, ज्यांचा या घरातील प्रवास संपला त्याचे नाव निमृत कौर असल्याचे जाहीर केले. निमृतच्या बाहेर पडण्यामुळे शिव ठाकरे खूपच भावनिक झाला होता. मंडळी मधील अजून एक सदस्य कमी झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मोनालिसा आणि पवन सिंग यांच्या ‘या’ जुन्या गाण्याने घातला सोशल मीडियावर धुमाकूळ, मिळवले मिलियन व्ह्यूज

अनुपम खेर यांना करोडोंची कार सोडून ऑटोमध्ये करावा लागला प्रवास; म्हणाले, ‘काहीही होऊ शकते’

हे देखील वाचा