बिग बॉसच्या घरात राहणे वाटते तितके सोपे नाही. अनोळखी लोकांसोबत ९० दिवस राहणे तेही बाहेरच्या जगाशी पूर्ण संपर्क तोडून. त्यामुळे या घरात अनेक वाद भांडण होतात. याचमुळे हा शो तुफान गाजत असतो. यंदा या वर्षी या शोचे १६ वे पर्व चालू आहे. या शोचे यंदाचे पर्व चांगलेच गाजत असून, त्यामुळे या शोला एक महिन्याची वाढीव मुदत देखील मिळाली आहे. या शोची प्रेक्षकांमध्ये तूफान क्रेझ दिसून येत आहे. यंदाच्या पर्वातील या घरातील एक स्पर्धक म्हणजे सुंबुल तौकीर. सुंबुल मालिकाविश्वातील ओळखीचा चेहरा आहे.
View this post on Instagram
‘इमली’ फेम सुंबुल तौकीरने या घरात राहून एक नवीन रेकॉर्ड तयार केले आहे. या रेकॉर्डची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. या घरात राहण्यासाठी सुंबुलने अनेक प्रयत्न केले. आज सुंबुलच्या या सर्व प्रयत्नांना यश आले आणि तिने तब्ब्ल १०० दिवस या घरात राहण्याचा विक्रम केला आहे. बिग बॉसच्या घरात १०० दिवस राहणारी सुंबुल तौकीर ही सर्वात तरुण स्पर्धक ठरली आहे. तिच्या या रेकॉर्डमुळे तिच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण असून, सध्या तिच्या या अनोख्या रेकॉर्डची जोरदार चर्चा सुरु आहे.
सुंबुलने घरात प्रवेश केल्यापासूनच स्वतःला या घरात सेटल करायला सुरुवात केली. या १०० दिवसांमध्ये सुंबुलने अनेक चढउतार पहिले. या दरम्यान तिच्यावर अनेक आरोप झाले, अनेक भांडणे झाली मात्र ती स्थिर राहिली. यामुळेच तिने हे रेकॉर्ड बनवले आहे. तिला नेहमी इतर सदस्यांनी बाहेर काढण्यासाठी नॉमिनेट केले होते, मात्र तिच्या फॅन्सने तिला नेहमीच वाचवले. आज सुंबुल सर्वांची आवडती स्पर्धक बनली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कुंडली भाग्य मालिकेमध्ये येणार २० वर्षांचा लीप, ‘हा’ मुख्य अभिनेता सोडणार मालिका?
कबीर बेदीने वयाच्या 70 व्या वर्षी 30 वर्षांनी लहान प्रेयसीसाेबत केले लग्न, वाचा संपूर्ण किस्सा