लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस 16‘ मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्गदर्शक साजिद खान यानेही हजेरी लावली आहे त्यामुळे अनेक लोकांनी आणि अभिनेत्रींनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. साजिद खान (Sajid Khan,) याच्या वर्तवणूकीमुळे त्याने केलेल्या अनेक घटनांचे खुलासे अभिनेत्रींनी केले आहेत. काहि दिवसांपूर्वी सोना महापात्रा आणि कनिष्का सोनी यांनी साजिदवर नको ते आरोप केले आहेत. आता पुन्हा प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. 2018 मध्ये मीटू मोहीम राबवली हती तेव्हा या अभिनेत्रीने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावरही लैगिंग शोषनाचा आरोप लावला होता. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती.
साजिद खान याने बॉलिवूडमध्ये असताना अनेक अभिनेत्रींसोबत अभद्र व्यवहार केला होता.त्यामुळे अनेक अभिनेत्री त्याला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाही. भारतामध्ये 2018 साली एक मीटू ही मोहीम राबवण्यात आली होती. तेव्हा अनेक अभिनेत्रींनी साजिद खानला निशाण्यावर धरले होते. यामध्ये मराठी चित्रपट अभिनेता नाना पाटेकर यांचेही नाव समोर आले होते. मात्र, सगळ्यात जास्त टीका सादिज खानवर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे चित्रपट दिग्दर्शनाचे हक्क काढून घेतले होते. त्यामुळे आपल्या आयुष्याला कंटाळून बिग बॉस सारख्या वादग्रस्त कार्यक्रमामध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्रीमनी आवज उठवला आहे.
बॉलिवूडची सुपर हॉट अभिनेत्री नुश्री हिने नुकत्यीच दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “मी आश्चर्यचकित आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे आणि त्याचा जनतेवर होणारा परिणाम पाहून मला मोठा धक्का बसला आहे. मी बिग बॉस पाहात नाही. मला वाटतही नाही की, यापुढे मी कधी बिग बॉस पाहिल. मीटू आंदोलन एक प्रतिष्ठित घटना होती. मी एक भारतीय अमेरिकन मुलगी असल्याच्या नात्याने मला एक समजत नाही की, अशाप्रकारच्या गोष्टीवर इंडस्ट्रीमध्ये मौन कसं काय धरु शकतात. मला वाटत आहे की, गैरवर्तुवणूकीला जर शिक्षा झाली तर सगळेच सुरक्षित राहतील.” अशा खोचक शब्दात तिने साजिद खान आणि बिग बॉसच्या कार्यक्रमावर टीका केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! 46 वर्षीय अभिनेत्यासाेबत राेमान्स करताना दिसली 28 वर्षीय अभिनेत्री म्हणाली, ‘ये दिल तुम बिन…’
खास क्षण! वैवाहिक आयुष्यात चांगलीच रमलीये काजल, साजरा केला लग्नानंतरचा दुसरा करवा चाैथ