Wednesday, June 25, 2025
Home टेलिव्हिजन एमसी स्टॅनच्या डोळ्यासमोर झाली त्याच्या मित्राची हत्या, त्याला मारण्याचा देखील केला होता प्रयत्न

एमसी स्टॅनच्या डोळ्यासमोर झाली त्याच्या मित्राची हत्या, त्याला मारण्याचा देखील केला होता प्रयत्न

विविध वादांसाठी प्रसिद्ध असणारा शो म्हणजे बिग बॉस. नुकतेच बिग बॉस चे १६ पर्व संपले. बिग बॉसच्या सर्वच पर्वांमधे हे सर्वात जास्त गाजलेले पर्व ठरले. म्हणूनच या पर्वाला चार आठवड्यांची मुदत देखील वाढवून मिळाली होती. काही आठवड्यांपूर्वीच या शोचा अंतिम सोहळा संपन्न झाला. यावेळी रॅपर एमसी स्टॅन विजेता ठरला. या शोमध्ये आल्यावर एमसी स्टॅनला जेवढी ओळख आणि प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षा अधिक तो अंतिम विजेता ठरल्यावर मिळाली. हा शो जिंकल्यानंतर मीडियामध्ये सतत एमसी स्टॅनबद्दल बातम्या येत असतात. असाच एक एमसी स्टॅनसंबंधित एक किस्सा मीडियामध्ये खूपच चर्चेत आहे.

सलमान खान आणि फराह खानच्या पार्टीमध्ये दिसलेल्या स्टॅनने नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी उघड केल्या. यात त्याने त्याच्या लहानपणीचा एक भयानक किस्सा सर्वांना सांगितला आहे. यात त्याच्या एका मित्राचा त्याच्या समोरच खून करण्यात आला होता. त्याच्या जीवाला देखील तेव्हा धिक निर्माण झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by MC STΔN ???? (@m___c___stan)

एमसी स्टॅनने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, त्याच्या डोळ्या देखत त्याच्या मित्राचा निर्घृण खून करण्यात आला होता. तो म्हणाला की, “एक वेळ होती जेव्हा माझ्याकडे फक्त चिंताच चिंता होती. तेव्हा माझ्या एका मित्राचा वाढदिवस होता आणि तो त्याच्या वाढदिवसाचा केक कट करत होता. तेव्हा त्याच्या गळ्यावर चाकू ठेवण्यात आला आणि त्याचा खून केला गेला. हे सर्व माझ्या डोळ्या देखत झाले होते. त्याच्या गळ्यावर एवढे वार केले गेले की, लगेच त्याचा मृत्यू झाला. सोबत मला देखील मारण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा मी बिग बॉस जिंकलो तेव्हा माझ्या आईवडिलांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते. हे सर्व माझ्या फॅन्समुळे झाले.”

बिग बॉस १६ नंतर आता एमसी स्टॅन कपिल शर्मा शोमध्ये दिसणार आहे. या शोच्या आगामी काही भागांमध्ये तो दिसेल. या सोबतच त्याने त्याचा म्युझिकल प्रवास देखील चालू केला आहे. स्टॅन देशातील विविध शहरांमध्ये त्याचे कॉन्सर्ट करणार असून, याबद्दल त्याच्या सोशल मीडियावरून सर्वांना तो माहिती देणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ

हे देखील वाचा