‘बिग बॉस 19’ची फायनलिस्ट तान्या मित्तल शो संपल्यानंतरही सातत्याने चर्चेत आहे. बिग बॉस 19 शोमधून तिला मोठी ओळख मिळाली आणि आता तिला तिचा पहिला अभिनय प्रकल्पही मिळाला आहे. मात्र, या पहिल्याच प्रोजेक्टमुळे तिला कौतुकाऐवजी ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. तान्याच्या अभिनयावर सोशल मीडियावरून अनेकांनी टीका केली असून, काहींनी तर तिला थेट “ओव्हर अॅक्टिंगची दुकान” असे संबोधले आहे.
बिग बॉस 19 संपल्यानंतर तान्या मित्तलला (Tanya Mittal)एका ब्रँडची जाहिरात मिळाली आहे. ही जाहिरातच तिचा पहिला अभिनय प्रकल्प ठरला आहे. नुकताच या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यामध्ये तान्या अभिनय करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी आणि नेटिझन्सनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या.
जाहिरात पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सनी तान्याच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी तिच्या एक्सप्रेशन्स आणि अभिनय शैलीवर टीका केली, तर काहींनी तिला अभिनयाचे धडे घेण्याचा सल्ला दिला. एका युजरने कमेंट करत लिहिले, “पहिलं आणि शेवटचं शूट. ओव्हरअॅक्टिंगची दुकान.” तर दुसऱ्याने म्हटले, “तान्याचा पीआर कमेंट सेक्शनमध्ये फक्त तिचंच कौतुक करत आहे.” आणखी एका युजरने लिहिले, “बिग बॉसमध्ये यापेक्षा चांगलं अभिनय करत होती.” तर काहींनी थेट, “किमान व्यवस्थित अभिनय तरी करा,” असा सल्ला दिला.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या या चर्चांमुळे तान्या पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आली आहे. काही चाहत्यांनी मात्र तिच्या बाजूने उभे राहत, हा तिचा पहिलाच प्रोजेक्ट असल्याने तिला संधी देण्याची मागणी केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, तान्या मित्तल ‘बिग बॉस 19’मध्ये टॉप पाच फायनलिस्टमध्ये पोहोचली होती. अंतिम फेरीत तिने दमदार कामगिरी केली, मात्र ट्रॉफी जिंकण्यात ती अपयशी ठरली आणि तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. संपूर्ण शोदरम्यान तान्या सतत चर्चेत राहिली होती. आता बिग बॉस 19 शोमधून अभिनयाच्या जगात पाऊल टाकताना तिला मिळणारी प्रतिक्रिया तिच्या पुढील प्रवासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










