‘बिग बॉस’ या प्रसिद्ध टेलीव्हिजन शोबाबत सोशल मीडियावर वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. शोचा होस्ट आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची उपस्थिती या क्रेझमध्ये आणखीच भर घालते. मागील वर्षीही सोशल मीडियावरील काही युझर्स आणि काही नेत्यांनी बिग बॉस बॅन करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आताही सोशल मीडियावर काही युझर्स बिग बॉस बॅन करण्याची मागणी करत आहेत.
ट्विटरवर शुक्रवारी रात्री अनसबस्क्राईब कलर्स टीव्ही, बॉयकॉट बिग बॉस हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. या सर्वांमागे कारण आहे, या शोची कन्सेप्ट.
खरं तर शोच्या एका एपिसोडदरम्यान बिग बॉस-१४ ची महिला स्पर्धक सिद्धार्थ शुक्लासोबत बोल्ड डान्स करताना दिसत आहे. कलर्स टीव्हीकडून या एपिसोडचा जो प्रोमो टाकण्यात आला होता, त्याच्या टिझरमध्ये लिहिले होते, “बिग बॉस१४ च्या घरातील हसीनांनी सिद्धार्थ शुक्लाला इंप्रेस करण्यासाठी दाखवला आपला जलवा.”
याला सोशल मीडियावर काही युझर्स अश्लील आणि आक्षेपार्ह म्हणत आहेत. असे म्हटले जात आहे की, महिला स्पर्धकांना अशाप्रकारे दाखवणे चुकीचे आहे. आणि अश्लीलता मनोरंजन नाही.
बिग बॉसच्या १४व्या सिझनमध्ये मागील सिझनमधील ३ स्पर्धकांनाही सामील केले आहे. या तीन स्पर्धकांमध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान यांचा समावेश आहे. हे स्पर्धक बिग बॉसमध्ये येणाऱ्या नवीन स्पर्धकांवर आपला दबदबा दाखवताना दिसत आहेत.
बीजेपी नेत्यानेही केला होता विरोध
बिग बॉसबद्दल बीजेपी खासदार सत्यदेव पचौरीने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, “हे बिग बॉस नाही, तर अय्याशीचा अड्डा आहे. अशा शोला पूर्ण विरोध केला पाहिजे आणि हे बंद केले पाहिजे. मी आजपर्यंत याचा एकही भाग पाहिला नाही, पण अशी माहिती मिळते. अशा शोमुळे समाजात घाण पसरत आहे, आणि त्यावर त्वरित बंदी घालायला हवी.”