Tuesday, July 9, 2024

Bigg Boss OTT: दिव्या अग्रवालने सर्वांसमोर केला करण जोहरचा अपमान; तो म्हणाला, ‘या टोनमध्ये माझ्याशी अजिबात…’

‘बिग बॉस’च्या घरामध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांवरून वाद होत असतात. यामुळेच ‘बिग बॉस’ हा सर्वात जास्त वादग्रस्त शो मानला जातो. या घरांमध्ये राहत असताना प्रत्येक स्पर्धकाला एकमेकांबरोबर व्यवस्थित राहावे लागते. स्पर्धकांचे एकमेकांबरोबर काही वाद असतील, तर ते शांतपणे मिटवणे अपेक्षित असते. परंतु बऱ्याचदा येथे मोठमोठ्याने होणारी भांडणेच पाहायला मिळतात. बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले जातात. हे टास्क पूर्ण करत असताना त्यात अडथळे निर्माण करणाऱ्यांना स्पर्धक खूप भांडतात. नुकतेच ‘बिग बॉस’मध्ये दिव्या अग्रवालचे चक्क होस्ट करण जोहरसोबत भांडण झाले. (bigg boss contestant divya aggarwal fight with karan johar)

दिव्या अनेक वेळा करणला त्याच्या मागे काही ना काही बोलताना आढळली आहे. अनेकदा तिने करण जोहरला नॉमिनेट करावे असेही बोली आहे. तसेच दिव्या म्हणाली की, “मी आणि माझ्या मैत्रिणीमध्ये काही भांडणे झाली, तर ती आम्ही दोघी नीट सोडवू. कोणताही गैरसमज पाळून आम्ही दूर राहणार नाही. यामध्ये मला सलमान खान आणि करण जोहर दोघेही अडवू शकत नाहीत.” तिच्या या बोलण्यावर करण जोहरला खूप राग आला. त्याने तिला खूप ऐकवले. करण जोहर तिला म्हणाला की, ” मी या शोचा सूत्रसंचालक आहे, आणि तू एक स्पर्धक आहेस. तू ठरवलंस तरी मला बाहेर काढू शकत नाही.”

दिव्या आणि करणमध्ये बराच वेळ वाद सुरू होता. दिव्याला करण त्याने बॉलिवूडमध्ये कमावलेल्या इज्जतीची थोडी तरी कदर कर असे सांगताना दिसला.

दिव्या अग्रवाल ही एक अभिनेत्री असून, ती एक मॉडेल आणि डान्सर देखील आहे. तिच्या अभिनयाने तिने अनेक चाहत्यांची त्यांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस ओटीटी’ फेम अक्षरा सिंगचं नवं गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला; अल्पावधीतच मिळाले तब्बल ‘इतके’ व्ह्यूज

-एअरपोर्टवर कुटूंबासह स्पॉट झाली करीना, पाहायला मिळाला चिमुकल्या तैमुर अन् जेहचा गोंडस अंदाज

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’नंंतर आता कंगना रणौतचा ‘थलायवी’ देखील होणार चित्रपटगृहात प्रदर्शित

हे देखील वाचा