नुकताच बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा अंतिम सोहळा संपन्न झाला. बिग बॉस १५ चा विजेता कोण होणार याबद्दल अनेक कयास लावले जात होते. शमिता शेट्टी, करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल आदी दमदार स्पर्धक या विजेत्यांच्या रेसमध्ये होते, मात्र तेजस्वीने शेवटच्या क्षणी बाजी पलटवत विजेत्याच्या ट्रॉफीवर नाव कोरले. सर्वांनाच प्रतीक जिंकणार असे वाटत असताना सलमान खानने तेजस्वीच्या नावाची घोषणा केली आणि अनेकांची निराशा झाली. मात्र बिग बॉसच्या १५ पर्वांमधे असे अनेक स्पर्धक होते, ज्यांनी भलेही बिग बॉसची ट्रॉफी जिंकली नाही, मात्र कोट्यवधी लोकांची मने नक्कीच जिंकली. आज आपण या लेखातून अशाच काही स्पर्धक कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत, जे बिग बॉस तर जिंकू शकले नाही, मात्र सर्वाधिक लोकप्रिय ठरले.
उमर रियाज :
बिग बॉसच्या १५ व्या पर्वातील तेजस्वी, प्रतीक यांचा सह स्पर्धक असणारा उमर या पर्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू ठरला होता. तो या शोच्या भावी विजेत्याच्या यादीत सर्वात वर होता. त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व, खिलाडू वृत्तीने सर्वच प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र एका टास्कमध्ये झालेल्या मोठ्या भांडणामुळे उमरला घारतून मधेच बाहेर पडावे लागले.
हिना खान :
बिग बॉसच्या ११ व्या पर्वात हिनाने सहभाग घेतला होता. टीव्ही इंडस्ट्रीमधील संस्कारी सून या टॅग मिटवण्यासाठी आणि तिची खरी बाजू जगासमोर आणण्यासाठी हा शो तिच्यासाठी खूपच फायदेशीर ठरला. या शोमध्ये हिनाने खूप ग्लॅमर आणले. अंतिम भागात शिल्पा शिंदे शोची विजेता ठरली मात्र शिल्पापेक्षा अधिक हिनाची लोकप्रियता होती.
असिम रियाज :
बिग बॉसच्या १३ व्या पर्वात असिमने सिद्धार्थ शुक्लाला तगडी स्पर्धा दिली. त्याच्यावर लोकांचे खूप प्रेम होते. त्याचा खेळ आणि घरातील वागणे सर्वांचं आवडत होते. फायनलला असिम आणि सिद्धार्थ आल्यानंतर अनेकांनी असिमलाच विजेता म्हटले मात्र सिद्धार्थ विजेता ठरला. असे असूनही असिमने खूपच प्रसिद्धी मिळवली.
शेहनाज गिल :
बिग बॉसच्या १३ व्या पर्वातील सिद्धार्थ, असिमसोबत सर्वात जास्त गाजलेली अभिनेत्री म्हणजे शेहनाज गिल. या शोआधी तिला जास्त प्रसिद्धी नव्हती मात्र आज तिचे नाव मोठे मानले जाते. तीच मजेशीर बोलणे आणि सिद्धार्थ आणि तिच्या केमिस्ट्रीमुळे ती खूपच गाजली भलेही ती हा शो जिंकली नाही मात्र तिला आज तुफान प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे.
विकास गुप्ता :
बिग बॉसच्या ११ व्या पर्वातील सर्वात मास्टरमाईंड खेळाडू म्हणून विकासाला ओळख मिळाली. त्याने या शोमध्ये त्याच्या डोक्याने अनेक टास्क जिंकले. वादांमुळे देखील तो चर्चेत आला होता.
मोनालिसा :
मोनालिसा बिग बॉसच्या १० पर्वाचा भाग होती. या पर्वाचा विजेता जरी मनवीर गुर्जर असला तरी मोनालिसाने तुफान लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली. या बिग बॉसच्या घरातच तिने तिचा बॉयफ्रेंड असलेल्या विक्रम सिंग राजपूतशी लग्न केले होते. याची आजही चर्चा होते.
सपना चौधरी :
हरियाणाचे प्रसिद्ध डान्सर असलेल्या सपनाने ११ व्या पर्वात सहभाग घेतला होता. पूर्वी फक्त हरियाणा आणि आजूबाजूच्या परिसरात ओळखली जाणारी सपना या शोमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली.
नोरा फतेही :
बिग बॉसच्या नवव्या पर्वात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून नोरा घरात आली होती. या घरात तिला जास्त लोकप्रियता मिळाली नाही मात्र आज नोरा तुफान लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय डान्सर म्हणून ती ओळखली जाते.
सनी लियोनी :
बिग बॉसच्या ६ व्या पर्वात सनी दिसली. या शोमध्ये तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने थेट बॉलिवूडमध्येच पदार्पण केले.
हेही वाचा :