Tuesday, July 23, 2024

‘नागिन ६’मधून रुबीना दिलैकचा पत्ता कट, माहिरा शर्मा असणार का नवी नागीण?

एकता कपूरचा सुपरहिट शो म्हणून ‘नागीन’ हा शो ओळखला जातो. या शोचे आतापर्यंत ५ सिझन आले असून पाचही सुपरहिट होता. या शोने अनेक अभिनेत्रींना वेगळी ओळख आणि तुफान प्रसिद्धी देखील मिळवून दिली. या शोचा सिझन संपला की, लगेचच प्रेक्षकांना नवीन सिझनची उत्सुकता लागते. प्रत्येक सिझनला मिळणार अमाप प्रतिसाद एकताला या शोचा नवनवीन सिझन आणण्यासाठी प्रेरित करतो. आता लवकरच ‘नागीन’ या शोचा सहावा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा एक प्रोमो देखील प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र हा टिझर पाहून आता या पर्वात ‘नागीन’ची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याबद्दल चर्चांना उधाण आले असून, त्याबाबत अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहे.

‘नागीन’ शोच्या या सहाव्या पर्वातील मुख्य भूमिकेसाठी महक चहल, रिद्धिमा पंडित आणि रुबीना दिलायक आदी अभिनेत्रीची नावे चर्चेत होती, मात्र आता हाती येणाऱ्या बातमीनुसार या तिघींपैकी कोणीच ही भूमिका करत नसल्याचे समजत आहे. प्राप्त माहितीनुसार एकता कपूरच्या बहुप्रतिक्षित नागीन या मालिकेमध्ये ‘नागीन’ या भूमिकेसाठी बिग बॉस १३ ची स्पर्धक असणाऱ्या माहिरा शर्माची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या भूमिकेसाठी एकता कपूर आणि माहिरा यांच्यामध्ये चर्चा सुरु असून, या चर्चा सकारात्मक असल्याची माहिती देखील आहे. एकताच्या या सुपरनॅचरल ड्रामामध्ये माहिरा शर्मा ‘नागीन’ असण्याच्या दाट शक्यता आहे.

तसे पाहिले तर माहिराने या शोमध्ये आधी काम केले आहे. तिने ‘नागीन ३’मध्ये जामिनी ही भूमिका साकारली होती. तिची भूमिका छोटी असली तरी महत्वाची होती. तिने तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. माहिराच्या करिअरच्या दृष्टीने ‘नागीन’ ही भूमिका मोठी गेमचेंजर ठरणार असून, तिचे फॅन्स देखील तिला या भूमिकेत बघण्यासाठी उत्सुक आहे.

मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या माहिराला बिग बॉसने तुफान ओळख आणि प्रसिद्धी मिळवून दिली. तिने काही मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. काही पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये देखील ती दिसली. माहिरा बहुतकरून पंजाबी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा