Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड निक्कीच्या मोहक फोटोंनी चाहते आऊट ऑफ कंट्रोल, बिकिनीत पाहायला मिळाला कमनीय बांधा अन् नागमोडी कंबर

निक्कीच्या मोहक फोटोंनी चाहते आऊट ऑफ कंट्रोल, बिकिनीत पाहायला मिळाला कमनीय बांधा अन् नागमोडी कंबर

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध, पण तितकाच वादग्रस्त असलेला रियॅलिटी शो म्हणजे ‘बिग बॉस‘ होय. या शोमधून बाहेर पडलेल्या कलाकारांनी अफाट लोकप्रियता मिळवली आहे. यामध्ये अभिनेत्री निक्की तांबोळी हिचाही समावेश आहे. ती या शोच्या चौदाव्या पर्वात झळकली होती. निक्कीचा सोशल मीडियावरही चांगलाच वावर असतो. तिला इंस्टाग्रामवर ३४ लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. त्यामुळेच कदाचित तिच्या प्रत्येक पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स मिळतात. आताही तिने अशीच एक हॉट पोस्ट शेअर केली आहे, ज्यावर लाखो लाईक्सचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हिने तिच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. यासोबतच तिने स्वत:ला ‘लाखात एक’ असेही म्हटले आहे. निक्कीचे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिच्यासाठी कौतुकाचे पूल बांधत आहेत.

निक्की तांबोळी हिने बिकिनीसोबत परिधान केली पिवळी साडी
निक्की तांबोळी हिने नुकतेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे. या लूकसोबतच तिने पिवळ्या रंगाची साडीही परिधान केली आहे. या फोटोत कधी निक्की तिच्या केसांसोबत खेळताना दिसत आहे, तर कधी ती तिचा कमनीय बांधा आणि नागमोडी कंबर फ्लॉन्ट करत आहे. हे बोल्ड आणि सिझलिंग फोटो शेअर करत तिने यमक जुळवणारे सुंदर कॅप्शनही दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “झील को कहते हैं, लेक, अपने आप की तुलना दुसरों के साथ क्यों करना जब आप हैं लाखों में एक.” म्हणजेच “तलावाला म्हणतात लेक, स्वत:ची तुलना दुसऱ्यांशी का करायची, जेव्हा तुम्हीच आहात लाखात एक.”

चाहत्यांकडून कमेंट्सचा महापूर
निक्की तांबोळी हिच्या या पोस्टवरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण होत आहे. तिच्या या फोटोवर प्रत्येकजण हार्ट इमोजी कमेंट करत आहे. एका युजरने तिची प्रशंसा करत लिहिले की, “निक्की फक्त एकच आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “ऍलेक्सा, प्ले हाय मेरा दिल. निक्की तांबोळी तू खूप स्टनिंग वाटत आहेस.” आणखी एकाने लिहिले की, “तुझा आऊटफिट खूप शानदार आहे.”

निक्कीच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. निक्कीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिने २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना ३’ या सिनेमात झळकली होती. याव्यतिरिक्त ती ‘बिग बॉस १४’मध्ये दुसरी उपविजेती ठरली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
काय होता तुम्ही, काय झालात तुम्ही! अमिताभ स्वत:च करतायेत टॉयलेट साफ, कपडे धुण्याचीही आलीय वेळ
‘बॉलिवूडसाठी तेलुगू इंडस्ट्री सोडण्याचा दम नव्हता’, हिंदी सिनेमांबद्दल ‘शिवगामी देवी’चे धक्कादायक विधान
प्रसिद्ध अभिनेत्यावर बला’त्काराचा आरोप; म्हणाला, ‘मी तर नामर्द आहे’

हे देखील वाचा