Tuesday, June 24, 2025
Home मराठी ‘मूठ ओवाळून जेव्हा तू बोट धरातेस…’, म्हणत अभिनेता अक्षय वाघमारेने केला मुलीसोबतचा क्यूट फोटो शेअर

‘मूठ ओवाळून जेव्हा तू बोट धरातेस…’, म्हणत अभिनेता अक्षय वाघमारेने केला मुलीसोबतचा क्यूट फोटो शेअर

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात स्पर्धक अक्षय वाघमारे याची या शोमधून मागच्याच आठवड्यात एक्झिट झाली आहे. अक्षय हा या शोमधून बाहेर जाणारा पहिलाच स्पर्धक आहे. त्याच्या आगमनाने त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला होता. दोन आठवडे तो बिग बॉसच्या घरात राहिला. त्याच्या प्रेमळ आणि गोड स्वभावाने त्याने प्रेक्षकांचे तसेच घरातील सगळ्या सदस्यांचे देखील मन जिंकून घेतले होते. घरातून बाहेर जाताना घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोळ्यात त्याच्यासाठी अश्रू आणि प्रेम स्पष्ट दिसत होते. घरातून बाहेर जाताना त्याचा घरातील सगळा प्रवास दाखण्यात आला होता. खरं तर, अक्षय इतक्या लवकर घरातून बाहेर जाईल, असे कोणालाही वाटेल नव्हते.

बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर अक्षयने त्याच्या लहान मुलीसोबत एक फोटो शेअर करून एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अक्षय त्याच्या मुलीसोबत दिसत आहे. ते दोघेही या फोटोमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. (Bigg Boss fame Akshay Waghmare share photo with his daughter on social media)

हे फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “मूठ आवळून जेव्हा तू बोट धरतेस, तो प्रत्येक क्षण माझा खास होतो. तुझ्या इवल्या इवल्याशा मुठीत मला जग जिंकल्याचा भास होतो.” त्याने शेअर केलेले हे गोड फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर अक्षया गुरव हिने “किती गोड,” अशी कमेंट केली आहे. तसेच पीयुष रानडेने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. यासोबतच अक्षयचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अक्षयने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची मुलगी योगिता हिच्याशी लग्न केले आहे. अक्षय आणि योगिताचा साखरपुडा २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी मे २०२० मध्ये लगीनगाठ बांधली होती. योगिताने या वर्षी १४ मेला त्यांच्या मुलीला जन्म दिला आहे. त्यांनी तिचे नाव अर्णा असे ठेवले आहे.

अक्षयने आतापर्यंत ‘दोस्तीगिरी’, ‘फत्तेशिकस्त’, ‘युथ’, ‘बस स्टॉप’, ‘शिव्या’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नवरात्रीच्या आठव्या दिवशी अपूर्वा नेमळेकरने घेतले विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेचे रूप

-लाल रंगाच्या ड्रेसमध्ये गौतमी देशपांडेच्या सौंदर्याला बहर! ‘सावन में आग लग गयी’ म्हणत चाहत्याकडून कौतुक

-‘ऋतुजा लग्न करशील का माझ्याशी?’, अभिनेत्रीची सोज्वळता पाहून चाहत्याने ठेवला थेट लग्नाचा प्रस्ताव

हे देखील वाचा