अभिनेत्री आणि पूर्व बिग बॉस स्पर्धक अर्शी खान हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. अर्शीचा रविवारी (२२ नोव्हेंबर) रोजी दिल्ली येथे अपघात झाला आहे. तिचा अपघात दिल्लीमधील मालवीय नगर येथे झाला आहे. ज्यातून ती थोडक्यात बचावली आहे. यात तिला काही जखमा झाल्या आहेत. तिला एका रुग्णालयात दाखल केले आहे. ती आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, अशी खान तिच्या मर्सडिज गाडीतून चालली होती. तेव्हा तिचा अपघात झाला आहे. जशी तिच्या कारची टक्कर झाली तसेच एअरबॅग ओपन झाली. त्यामुळे मोठा अपघात होता होता वाचला. त्यामुळे तिला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. परंतु तरी देखील तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Bigg boss fame arshi khan escapes a major accident in delhi)
अर्शी खानला ‘बिग बॉस ११’ मधून लोकप्रियता मिळाली होती. या शोमध्ये विकास गुप्ता आणि शिल्पा शिंदे यांच्यासोबत असलेली तिची मैत्री खूप चर्चेत होती. या शोमधील तिचा खेळ सगळ्यांना आवडला होता.
यानंतर ती ‘बिग बॉस १४’ मध्ये देखील दिसली होती. या शोमधून देखील तिला सर्वत्र लोकप्रियता मिळाली होती. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद देत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल