Saturday, July 6, 2024

‘बिग बॉस’ फेम अर्शी खानने एअरपोर्टवर गाठलं चुकीचं टर्मिनल, लक्षात येताच झाली धावपळ, पाहा तिचा ‘हा’ मजेशीर व्हिडीओ

बिग बॉस 14 ची स्पर्धक अर्शी खान ही नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. त्यावेळी ती टर्मिनल दोनवर पोहोचली होती. तिथे फोटोग्राफरला पोज देऊन फोटो काढत होती. पण तेव्हा तिला समजले की, तिची फ्लाईट टर्मिनल 1 ला आहे. यावेळी ती खूपच घाबरली आणि ती पटकन तिच्या गाडीत जाऊन बसली. तिचा हा सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आणि आता तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहे.

अर्शी खानने सांगितले की, तिला होळीच्या कार्यक्रमासाठी गोव्याला जायचे होते. परंतु ती चुकून मुंबईच्या एअरपोर्ट टर्मिनल 2 मध्ये गेली. या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकू शकता की, अर्शी म्हणते, “हा टर्मिनल 2 आहे का? मला टर्मिनल 1 ला जायचे होते.” त्यांनतर ती तिच्या गाडीकडे गेली. तिचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अर्शी खानने नुकताच मुंबईमध्ये तिचा स्वतःचा फ्लॅट घेतला आहे. यासाठी तिने सलमान खानचे आभार देखील मानले आहे. तिने सांगितले की, “माझ्याकडे अजिबात काम नव्हते, तेव्हा मला वाटत होते की, मी आता पैसे कसे कमावणार. त्यानंतर माझे काही शो झाले, मी काही चित्रपट केले त्यानंतर मला बिग बॉस 14 च्या माध्यमातून खूप चांगली मदत झाली. मुंबईमध्ये घर घेणे हे माझे स्वप्न होते आणि ते सलमान खानमुळे पूर्ण झाले. मी त्यांचे खूप आभार मानते की, त्यांनी मला एवढी मदत केली.”

अर्शी खान बिग बॉस 14 मध्ये सक्रिय होती. या शोमधील तिची मस्ती सगळ्यांना खूपच आवडली होती. तिचे आणि विकास गुप्ता यांचे शोमध्ये भांडण देखील झाले होते. विकास गुप्ताने तिला स्विमिंग पुलमध्ये ढकलून दिले होते, तेव्हा त्यांच्यात खूप वाद झाले होते. त्यामुळे विकासला या शोमधून बाहेर काढण्यात आले होते. पण त्यानंतर तो परत या शोमध्ये आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुशांतच्या गोड आठवणी! होळीदरम्यानचा थ्रोबॅक व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

-इरफान खानच्या आठवणीत मुलगा बाबिल झाला भावुक; वडिलांचे कपडे परिधान करत दिला आठवणींना उजाळा

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

हे देखील वाचा