Thursday, November 30, 2023

खळबळजनक! अभिनेत्री हिंमाशी खुरानाची प्रकृती चिंताजनक, रुग्नालयात केले दाखल

पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना तिच्या आगामी ‘फत्तो दे यार बडे’ या चित्रपटासाठी रोमानियामध्ये शूटिंग करत होती. यादरम्यान, तेथील अति थंडीमुळे तिची प्रकृती खालावली. माध्यमातील वृत्तानुसार, हिमांशी खुराना जास्त थंडी सहन करू शकली नाही आणि त्यामुळे तिला खूप ताप आला, त्यानंतर तिला ताबडतोब रोमानियातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

अभिनेत्री हिमांशी (himanshi khurana) जेव्हा या चित्रपटाचे शूटिंग करत होती तेव्हा तापमान 7 डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. माध्यमातील वृत्तानुसार, ती विश्रांती न घेता शूटिंगमध्ये व्यस्त होती. चित्रपटाचा एक सीनही थंड पाण्यात शूट केला जाणार होता. त्यात तिची तब्येत बिघडल्याने तिच्या नाकातून रक्त येऊ लागले. तेथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. हिमांशीच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतेही नवीन अपडेट आलेले नाही.

‘बिग बॉस’ने हिमांशीला लोकप्रियता मिळवून दिली, पण शो सोडल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. एका संवादामध्ये तिने ‘बिग बॉस’च्या नकारात्मक वातावरणाला तिच्या डिप्रेशनचे कारण सांगितले. जवळपास 2 वर्षांपासून ती डिप्रेशनची शिकार होती. तिला शूटिंगदरम्यान अनेकदा पॅनिक अटॅक देखील यायचा, त्‍यामुळे तिला हाॅस्पिटलमध्ये नेण्यात येत हाेते.

हिमांशीने ‘सद्दा हक’, ‘लेदर लाइफ और अफसर’ आणि ‘जीत जायेंगे जहाँ’ या सारख्या दमदार चित्रपटांसह अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रेक्षकांनी तिला अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही पाहिले आहे. ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’च्या ऑरिजिनल वर्जनमध्ये ती दिसली हाेती. तेव्हा लाखो तरुणांना तिचे वेड लागले हाेते. या म्युझिक व्हिडिओमुळे तिच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाली हाेती. (bigg boss fame himanshi khurana admitted to hospital after high fever bleeding from nose during film shoot know health update)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मिथुन चक्रवर्ती यांच्या नवीन चित्रपटाला का मिळाली नाही सिनेमागृहात जागा? वाचा कारण

अजय देवगणच्या लेकीनं घातला डीप नेक ड्रेस; चाहते संतापत म्हणाले, ‘माय-बापानं जास्तच…’

हे देखील वाचा