‘बिग बॉस १३’ ची स्पर्धक असलेली टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई सध्या तिच्या फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर रश्मीची लोकप्रियता वाढली आहे. रश्मी देसाई सतत तिच्या जबरदस्त अवताराने चाहत्यांना आश्चर्यचकित करते. दरम्यान, रश्मीचे काही नवीन फोटो समोर आले आहेत, जे चाहत्यांचे भान हिरावून घेत आहेत. या फोटोंमध्ये रश्मी खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिचे हे व्हायरल होत असलेले फोटो मालदीवमधील आहेत.
रश्मीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये रश्मी हिरव्या रंगाच्या फ्लोरल डीपनेक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रश्मीने एकापेक्षा एक पोझ देत अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रश्मी सापाप्रमाणे झाडाभोवती गुंडाळलेली दिसत आहे. तिची किलर पोझ एकदम जबरदस्त दिसत आहे. त्याचबरोबर आणखी एका फोटोत तिने लाजताना पोझ दिली आहे.
रश्मीने फोटो शेअर करत “आयलँड वाइब,” असे कॅप्शनही दिले आहे. रश्मीच्या या फोटोंवर अल्पावधीतच लाखो लाईक्स आले आहेत, तर हजारो चाहत्यांच्या पोस्टवर कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने रश्मीच्या फोटोवर “गॉर्जियस”, तर एकाने “स्टनिंग” अशी कमेंट केली आहे. तिच्या या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
रश्मीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर तिचे पहिले लग्न नंदिश संधूसोबत झाले होते, ज्याच्यापासून तिचा २०१६ साली घटस्फोट झाला होता. यानंतर ‘बिग बॉस १३’मध्ये अरहान खानसोबतही तिचे नाव जोडले गेले. मात्र, हे नातेही काही दिवसांपुरतेच होते.
रश्मी देसाईला टीव्ही जगतातील ‘उतरन’ या लोकप्रिय शोमधून एक वेगळी ओळख मिळाली. तिने या वर्षी एका वेबसीरिजमध्ये पदार्पण केले, ज्याचे नाव ‘तंदूर’ असे होते. या सीरिजमधील रश्मीच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय ती एका म्युझिक व्हिडिओमुळेही चर्चेत होती. रश्मी शेवटची ‘नागिन ४’ मध्ये दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उर्वशी रौतेलाची जादू पाहिली का? हवेत लटकताना दिसली काकडी; पाहून तुम्हीही व्हाल हैराण
-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…
-कॅन्सरवर उपचार सुरू असताना महेश मांजरेकरांनी केले होते ‘अंतिम’चे शूटिंग










