प्रसिद्ध टीव्ही शो ‘बिग बॉस 14’ चा रनरअप विजेता आणि गायक राहुल वैद्य. तो बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्याच्या प्रेयसीसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे. बिग बॉसमधून त्याला प्रचंड ओळख मिळाली आहे. तसेच त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये देखील कमालीची वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याकारणाने त्याच्या आयुष्याशी निगडित प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असते. त्याची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असते. नुकताच त्याचा त्याची प्रेयसी दिशा परमार सोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नुकतेच काही दिवसापूर्वी राहुल आणि दिशा एका कार्यक्रमात गेले होते. त्या कार्यक्रमातील त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत दिशाने लाल रंगाचा लेहंगा आणि ब्लाऊज घातला आहे. तसेच लाल रंगाची ओढणी घेतली आहे. अगदी हलकासा मेकअप केला आहे आणि काही दागिने देखील घातले आहेत. या लूकमध्ये दिशा खूपच सुंदर दिसत आहे.
राहुलने काळया आणि राखाडी रंगाचे ब्लेजर घातले आहे. सोबतच काळया रंगाची जीन्स घातली आहे. या पोशाखात तो खूपच सुंदर दिसत आहे. या दोघांनी एकमेकांसोबत पोज देत फोटो काढले आहे. शिवाय दोघांचा एक व्हिडिओ देखील व्हारायल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दिशा आणि राहुल स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. त्यांनी ‘मैं हू ना’ या चित्रपटातील ‘तुमसे मिल के दिलं का जो हाल’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यात त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार राहुल आणि दिशा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अक्षरा सिंगच्या ‘पगली बुलावे’ गाण्याची यूट्यूबवर जोरदार एंट्री! पुन्हा लावले चाहत्यांना वेड
-सपना चौधरीला टक्कर देत, हरियाणवी गायिका रेणुका पंवार घेऊन आली नवं गाणं! पाहा व्हिडिओ










