Friday, July 5, 2024

‘होळी पार्टीमध्ये एका व्यक्तीने माझ्या स्कर्टमध्ये हात…’, बिग बॉसची माजी कंटेस्टेंट सोफिया हयातचा धक्कादायक खुलासा

‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक आणि मॉडेल सोफिया हयात ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. त्यामुळे तिचा फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झालेली दिसून येत आहे. तिच्या कोणत्याही फोटोला किंवा व्हिडिओला प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. सोफियाने आता तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, एकदा होळी खेळताना एका व्यक्तीने तिच्या स्कर्टमध्ये हात घालण्याचा प्रयत्न केला होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सोफियाने सांगितले की, भारतात हा रंगांचा सण खेळताना तिच्यासोबत एक प्रसंग घडला होता. तिने सांगितले की, “मी एका होळी पार्टी मध्ये गेले होते. जिथे खूप कलाकार आले होते. तिथे अनेक जण माझ्यासोबत सेल्फी घेत होते. खरं तर जेव्हा खूप फॅन्स असतात, तेव्हा मी खूप प्रोटेक्टेड असते. पण या पार्टीत मी खूप बिनधास्त होते.”

नुकतेच सोफियाने बिकिनीमध्ये होळी खेळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोफियाने पुढे सांगितले की, “मी त्या होळी पार्टीमध्ये पाणी पुरी खाल्ली पण मला हे माहीत नव्हते की, त्या पाणी पुरीमध्ये भांग मिसळला होता. मला भांगेची नशा चढली आणि मी खूपच बिनधास्त झाले. मी सगळ्यांसोबत फोटो काढत होते, तेव्हा एका व्यक्तीने त्याच्या हाताने माझा स्कर्टवर केला.”

पुढे तिने सांगितले की, “मला पहिल्यांदा असे वाटले की, असं नाही होऊ शकणार पण त्या माणसाने परत तसंच केलं. त्यावेळी मी त्याच्या छातीवर धक्का मारून त्याला खाली पाडले.”

सोफियाने त्यावेळी एका पत्रकाराचे कौतुक करतेवेळी सांगितले की, “त्यावेळी पत्रकार तिथे उपस्थित होते. त्यातील एका पत्रकार मला माझ्या गाडीपर्यंत सोडून आला. त्यानंतर मी सुरक्षित ठिकाणी पोहोचले.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हरियाणवी गायिका रेणुका पवारच्या गाण्याने वाढवला यूट्यूबचा पारा, व्हिडिओत दिसतेय एकदम कडक

-श्रद्धा कपूरला पाहून मुलांनी म्हटले ‘होली है’, रंगाने भरलेले फुगे पाहून घाबरली अभिनेत्री, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

हे देखील वाचा