Tuesday, July 23, 2024

सोनालीला न्याय मिळावा म्हणून लढतेय तिची लेक; म्हणाली, ‘मुख्यमंत्र्यांनी विश्वास देऊनही सीबीआय तपास नाहीच’

‘बिग बॉस 14’ फेम सोनाली फोगाट हिचे 22 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. तिच्या निधनाला आठवडा उलटला आहे. आधी असे म्हटले गेले होते की, तिचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहे. मात्र, कुटुंबाच्या प्रतिक्रियेनंतर आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर हे प्रकरण हृदयविकाराकडून थेट हत्येकडे वळाले. कुटुंबीयांनी अभिनेत्रीच्या पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदर सिंग याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांचा आरोप आहे की, त्यांनीच सोनालीची हत्या केली आहे. तिचे कुटुंबीय या प्रकरणाची सीबीआय तपासणी व्हावी अशी मागणी करत आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, या दोघांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.

दुसरीकडे सोनाली फोगाट (Sonali Phogat) हिची मुलगी यशोधरा (Sonali Phogat Daughter Yashodhara) हिनेदेखील सीबीआय तपासणीची मागणी केली होती. मात्र, आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे तीदेखील चिंतेत आहे. तिने तिच्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी जी लढाई लढली आहे, त्यात तिला आता माघार घ्यायची नाहीये.

‘हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं, सीबीआय तपास होणार’
यशोधरा (Yashodhara) हिने म्हटले आहे की, “मी सीबीआय तपासणीची मागणी केली होती. सध्या जी परिस्थिती आहे, त्याने मी समाधानी नाहीये. आतापर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाहीये. हे माझ्या आईला न्याय मिळवण्याबद्दल आहे आणि आता आम्ही मागे हटणार नाही. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, लवकरच सीबीआय तपास होणार, पण त्यावर अजूनही कार्यवाही झालेली नाहीये.”

तांत्रिकाचाही समावेश
मागील काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, सुधीर सांगवान हा तांत्रिकाचा वापर करून सोनालीवर ताबा मिळवत होता. सोनालीच्या जवळच्या व्यक्तीने माध्यमांना सांगितले की, सोनालीचा पीए सुधीर फसवणूक करणारा होता. मात्र, माहिती नाही की, सोनाली त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायची. सुधीर तांत्रिकामार्फत सोनालीवर ताबा मिळवायचा. त्याने सोनालीला तांत्रिकामार्फत विश्वास दिला होता की, तिच्यावर कोणतीही अडचण आली, तर तिची सुरक्षा फक्त सुधीर करू शकतो. त्यामुळे सोनालीला सुधीरवर एवढा विश्वास होता.

विशेष म्हणजे, सोनालीच्या जवळच्या व्यक्तीने हेही सांगितले की, सुधीरकडून सोनालीची मुलगी यशोधरा हिलादेखील धोका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विल स्मिथची झापड अजूनही विसरला नाही ख्रिस रॉक! घेतला मोठा निर्णय, घडणार का अनर्थ?
धक्कादायक! आईसाठी औषधे घेऊन जात असताना अभिनेत्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात घेतोय उपचार
‘या’ नावाने ओळखला जाणार अनिल कपूरांचा नातू; व्हिडिओद्वारे झाला खुलासा

हे देखील वाचा