Friday, July 5, 2024

‘बिग बॉस १५’मध्ये होणार धुमाकूळ, उर्फी जावेद करतेय वाईल्ड कार्ड एन्ट्री?

बॉलिवूड कलाकार जेवढे चर्चेत राहत नाहीत, कदाचित तेवढी जास्त चर्चा ही उर्फी जावेदची होते. ‘बिग बॉस ओटीटी’बद्दल बोलायचे झाले, तर उर्फीला इथे एका आठवड्यातच निर्मात्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. उर्फीच्या इव्हिक्शनने सर्वांचीच मने मोडली होती.  ‘बिग बॉस ओटीटी’तून बाहेर पडल्यापासून उर्फीने माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. ती आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालते. मात्र, विचार करा की, जर उर्फी जावेदला ‘बिग बॉस १५’मध्ये ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ मिळाली, तर कसे होईल. घरातील गोंधळाच्या वेळी स्पर्धकांनी उर्फी जावेदची आठवण काढली. अशा स्थितीत पुढील तिची ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’ होऊ शकते.

चाहत्यांना आली उर्फीची आठवण
‘बिग बॉस १५’ च्या घरातील एक न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ओटीटी स्पर्धक उर्फी जावेदच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना दिसत आहेत. बोलत असताना निशांत भट्ट लगेच उमर रियाजचा पाय खेचतो लागतो. (Bigg Boss Fame Urfi Javed To Enter In Salman Khan Show Bigg Boss 15)

करणनेही खेचला उमरचा पाय
दुसरीकडे, करण कुंद्रा उमरचा पाय खेचत म्हणतो की, त्याला त्याची वहिनी घरात हवी आहे. यानंतर निशांत भट्ट म्हणतो की, घरात उमरफी असलीच पाहिजे. या गोष्टी ऐकून घरातील बाकीचे सदस्य खूप हसले आणि उमर लाजला.

निर्माते करू शकतात एन्ट्री
‘बिग बॉस १५’ चे निर्माते सध्या कमी टीआरपीमुळे खूप नाराज आहेत. राकेश बापट आणि अफसाना खान गेल्यानंतर त्यांना या शोमध्ये उर्फी जावेदची एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे. उर्फी जावेदने आपल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले आहे की, त्याच्याकडे सध्या कोणतेही काम नाही.

अलीकडेच उर्फीने तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते, ज्यात ती ऍनिमल प्रिंट ब्रा आणि स्कर्टमध्ये दिसली होती. तसेच, तिने स्वतःचा एक हॉट व्हिडिओही शेअर केला होता, ज्यामध्ये उर्फीने स्किन कलर टॉप आणि स्कर्ट घातलेली दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-याला म्हणतात खरी प्रतिभा! नोरा फतेहीच्या ‘कुसू-कुसू’ गाण्यावर ‘या’ मुलांनी केला धमाकेदार डान्स

-‘बाँब स्क्वाड’ डान्स ग्रूपच्या तीन मुलींनी ‘टिप टिप बरसा पानी’वर केला जबरदस्त डान्स, तुमचेही थिरकतील पाय

-करण जोहरने आलिया भट्टसोबत खेळला मजेदार रॅपिड फायर राऊंड, अभिनेत्रीनेही दिली धमाकेदार उत्तरे

हे देखील वाचा