‘बिग बॉस’चे १५ वे पर्व सध्या सुरू आहे. यामध्ये देखील पहिल्या दिवसापासूनच भांडणांना सुरुवात झाली. बिग बॉसचे घर म्हणजे नुसती भांडणे असा अनेकांचा समज आहे. मात्र या घरामध्ये प्रेम, मैत्री आणि आपुलकी देखील आहे. इथे एकदा नाही तर दोन वेळा लग्नाचा थाट घातला गेला आहे. तसेच घरातील सर्व सदस्य या लग्नाला एकत्र वऱ्हाडी म्हणून आले आहेत. बिग बॉसच्या घरात लग्न केलेले कलाकार नेमके कोण आहेत हे जाणून घेऊ.
सारा खान – अली मर्चंट
‘बिग बॉस ४’ मध्ये सारा खान आणि अली मर्चंट दोघेही स्पर्धक म्हणून आले होते. त्यावेळी बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांचा निकाह करण्यात आला होता. बिग बॉसचे घर पूर्णतः एक लग्न घरासारखे सजवण्यात आले होते. या लग्न सोहळ्यात बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धक देखील उत्सुकतेने सहभागी झाले होते. तसेच सारा खानचे आई वडील देखील यावेळी बिग बॉसच्या घरात आले होते. दोघांचा निकाह मोठ्या उत्साहात पार पडला होता. (Bigg Boss house has become a wedding pavilion twice khow which contestant got married in the house)
काही दिवसांमध्येच तुटले लग्न
सारा आणि अली या दोघांचे हे लग्न फार दिवस टिकले नाही. २०१० मध्ये लग्न झाल्यानंतर लगेचच पुढल्या वर्षी म्हणजे २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यावेळी साराच्या आई वडिलांना देखील या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. काही वृत्तानुसार दोघांनी देखील फक्त काही पैशांसाठी लग्न केले होते. दोघांनाही यासाठी बिग बॉसने ५० लाख रुपये दिले असल्याची त्यावेळी चर्चा सुरू होती.
मोनालिसा-विक्रांत सिंग
भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्री मोनालिसा बिग बॉस १० मध्ये स्पर्धक म्हणून आली होती. बिग बॉसच्या घरातील सर्वात लोकप्रिय असलेल्या सदस्यांच्या यादीतील ती एक होती. बिग बॉसच्या घरामध्ये तिने बॉयफ्रेंड विक्रांत सिंग बरोबर लग्न केले होते. त्यावेळी बिग बॉसच्या घरात हळदी आणि मेहंदीपासून सर्वच विधी पार पाडत लग्न लावले गेले. या लग्नसोहळ्यात विक्रांतची बहिण आणि मोनालिसाची आई तसेच भोजपुरी कलाकार निरहुआ आणि आम्रपाली देखील उपस्थित होते.
आजही आहेत एकत्र
विक्रांत आणि मोनालिसा आजही एकत्र राहतात. दोघांनीही अभिनय क्षेत्रात मोठं नाव कमवलं आहे. विक्रांत भोजपुरी चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, तर अभिनेत्री चित्रपटांसह मालिकांमध्ये देखील काम करते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे