[rank_math_breadcrumb]

शेतकरी कुटुंबातून थेट विजेतेपदापर्यंतचा प्रवास; गिली नाटा ठरला बिग बॉस कन्नड सीझन 12चा विनर

बिग बॉस कन्नड सीझन 12 चा विजेता म्हणून लोकप्रिय कॉमेडियन गिली नाटा याने बाजी मारली आहे. 18 जानेवारी 2026 रोजी प्रसारित झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये अंतिम दोन स्पर्धकांमध्ये गिली नाटा आणि रक्षिता शेट्टी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर सुपरस्टार किच्चा सुदीप यांनी गिलीचा हात उंचावून त्याला या सीझनचा विजेता घोषित केला. विजेतेपदासह गिलीने 50 लाख रुपयांची रोख बक्षीस रक्कम आणि एक नवी मारुती सुझुकी विक्टोरिस कार जिंकली. रक्षिता शेट्टी हिने उपविजेतेपद पटकावले.

ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचताना धनुष (Dhanush)गौडा सहाव्या, म्युटंट रघु पाचव्या आणि काव्या चौथ्या क्रमांकावर एलिमिनेट झाले होते. टॉप-2 मध्ये फक्त गिली नाटा आणि रक्षिता शेट्टी यांचीच निवड झाली होती. बिग बॉस कन्नड 12 चा अंतिम भाग कलर्स कन्नड वाहिनीवर तसेच जिओ हॉटस्टारवरही प्रसारित करण्यात आला.

गिली नाटा मूळचा कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील मालवल्ली तालुक्यातील मटाडापुरा गावचा रहिवासी आहे. तो एका शेतकरी कुटुंबातून आला असून त्याचे बालपण साधे पण संघर्षांनी भरलेले होते. स्थानिक पातळीवर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने ITIचे शिक्षण घेतले. सुरुवातीला चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न असले तरी आर्थिक अडचणींमुळे त्याला मनोरंजनसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

बेंगळुरूमध्ये गिलीने सुरुवातीला सेट असिस्टंट म्हणून काम केले. आर्ट्स डिपार्टमेंटमध्ये काम करताना त्याने क्राफ्ट, स्क्रिप्ट रायटिंग, शॉर्ट फिल्म्स आणि कॉमेडी स्किट्समध्येही हात आजमावला. दैनंदिन जीवनावर आधारित साधी, पण प्रभावी कॉमेडी हीच त्याची ओळख ठरली. विशेष म्हणजे, गिली नाटा हे त्याचे स्टेज नेम असून त्याचे खरे नाव नटराज आहे. बिग बॉसपूर्वी तो डान्स कर्नाटक डान्स आणि कॉमेडी किलाडिगालु सीझन 4 मध्येही झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

‘धुरंधर’ नंतर सारा अर्जुनला अधिक जबाबदारीची जाणीव, हा आहे आवडता टॉलीवूड स्टार