बिग बॉस मराठीच्या घरात दर आठवड्यात अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. भांडण-तंटे तर घरात चालूच असतात. पण या आठवड्यात मात्र सगळेच स्पर्धक भावुक झाले आहेत. तसेच त्यांना त्यांचे अश्रू देखील अनावर झाले आहे. याचे कारण म्हणजे या आठवड्यात अक्षय वाघमारे हा घरातून बाहेर गेला आहे. या आठवड्यात सुरेखा आणि अक्षय हे दोघे डेंजर झोनमध्ये होते. परंतु अक्षयला प्रेक्षकांचे प्रेम कमी पडल्याने तो तिसऱ्या आठवड्यात घरातून बाहेर गेला. त्यामुळे घरातील सगळ्यांचं खूप दुःख झाले आहे. अक्षय बाहेर जाताना घरातील प्रत्येक सदस्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
एकीकडे हे दुःखाचे वातावरण असताना दुसरीकडे या शोमध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. त्यामुळे आता खेळात चांगलीच रंगत येणार आहे. मागील दोन दिवसापासून या सदस्याची व्हिडिओ व्हायरल होत होती. सगळेजण तो कोण असेल हा अंदाज लावत होते. प्रेक्षकांनी लावलेला अंदाज खरा ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात अभिनेता आदिश वैद्यची पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आहे. (Bigg Boss Marathi 3 : actor adish vaidya is coming in home as a first wild card entry)
आदिशने ‘बचना ए हसीनो’ आणि ‘ब्रिंग इट ऑन’ या गाण्यावर डान्स करून धमाकेदार एंट्री केली. त्याच्यातील जोश पाहून हा शोमध्ये काहीतरी रंगत आणणार आहे, अशी सगळेजण आशा व्यक्त करत आहेत. आदिश हा बिग बॉसमधील पहिला वाईल्ड कार्ड असा सदस्य, असेल जो तिसऱ्याच आठवड्यात आला आहे. त्यामुळे हा शो नक्कीच एका वेगळ्या वळणावर जाताना पाहायला मिळणार आहे यात काही वाद नाही.
जेव्हा मांजरेकर त्याला शोबद्दल विचारतात तेव्हा तो म्हणतो की, “मी माझे सगळे प्रयत्न करेल. आजपर्यंत कोणताच वाईल्ड कार्ड एंट्री सदस्य विनर झालेला नाही. पण मी नक्कीच ही ट्रॉफी घरी घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल.” यावर मांजरेकर त्याला त्याचे घरातील आवडते स्पर्धक कोण आहेत असं विचारतात. तेव्हा तो विशाल, विकास आणि मीनल यांची नावे सांगतो. आता त्याच्या येण्याने घरात काय बदल होणार आहे? तो कोणत्या टीमच्या बाजूने खेळेल? बाहेरील जगात स्पर्धकांबद्दल काय चर्चा चालू आहे हे तो त्यांना सांगेल का? हे बघण्यासाठी बिग बॉस प्रेमी खूप उत्सुक आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण
सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे