‘बिग बॉस मराठी’च्या घरातून आठव्या आठवड्यात नुकतेच अभिनेत्री स्नेहा वाघ हिची एक्झिट झाली आहे. बिग बॉसच्या घरातील ही सर्वात जास्त चर्चेत असणारी स्पर्धक होती. तिने बिग बॉसमध्ये तिचा जास्त काही खेळ दाखवला नाही. परंतु तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती शोमध्ये जोरदार चर्चेत होती. तब्बल ६० दिवस पूर्ण झाल्यावर तिचा बिग बॉसचा प्रवास संपला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना खूपच वाईट वाटत आहे.
खरंतर या आठवड्यात स्नेहा स्वतःहून नॉमिनेट झाली नव्हती. मागील आठवड्यात जयला कॅप्टन्सी मिळवून देण्यासाठी ती नॉमिनेट झाली होती. तिला प्रेक्षकांचा पाठिंबा कमी मिळाल्याने ती या घरातून बाहेर गेली आहे. स्नेहाबाबत खास गोष्ट म्हणजे स्नेहा कोणत्याही टीममधील नव्हती. ती टास्कमध्ये ज्या टीममध्ये यायची त्या टीमकडून ती खेळत होती. (Bigg Boss Marathi 3 : actress Sneha wagh exit from BBM house)
घरात आल्यावर स्नेहाला एक आश्चर्याचा धक्का बसला होता. तो म्हणजे स्नेहाचा पहिला पती अभिनेता आविष्कार दार्व्हेकर देखील घरात होता. त्या दोघांचा बऱ्याच वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. स्नेहा केवळ १८ वर्षाची असताना त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता. परंतु नंतर स्नेहाने त्याच्यावर कौटुंबिक अत्याचाराचा आरोप केला आणि ते दोघे वेगळे झाले. यानंतर स्नेहा पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली होती. परंतु दुसऱ्या लग्नात देखील हिच समस्या आल्याने तिचे दुसरे लग्न देखील मोडले. या सगळ्या गोष्टींमुळे स्नेहा खूप चर्चेत राहिली आहे.
या आठवड्यात तिच्यासोबत मीरा डेंजर झोनमध्ये होती. त्यावेळी कमी व्होटिंग मिळाल्याने स्नेहा घरातून बाहेर गेली आहे. तिच्या जाण्याने सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. घरात तिचे दादूस आणि जय यांच्याशी खूप चांगला बाँड झाला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा
-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ
-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल