Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील पहिले एलिमिनेशन पडले पार, ‘या’ स्पर्धकाची घरातून झाली एक्झिट

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात पहिलेच एलिमिनेशन पार पडले आहे. खरंतर घरातील खेळ एकदम रंगात आला होता. सगळेच स्पर्धक खूप चांगल्या पद्धतीने खेळ खेळत होते. अशातच एलिमिनेशन झाले आहे, त्यामुळे सगळेच नाराज झाले आहेत. या आठवड्यात स्नेहा, सुरेखा, विशाल, तृप्ती, अक्षय आणि दादूस हे नॉमिनेट झाले होते. घरात पहिल्यांदा एलिमिनेशन होणार असल्याने कोणाला किती वोट मिळतील हे पाहण्यासाठी सगळेच उत्साहित होते. या वीकेंडला मांजरेकरांनी घरातून बाहेर जाणाऱ्या सदस्याने नाव जाहीर केले.

वीकेंड देखील रंगात आला होता. संपूर्ण एपिसोड एकदम मजेत गेला. परंतु जेव्हा एलिमिनेशनची वेळ आली तेव्हा मात्र सगळेच खूप नाराज झाले. शेवटी अक्षय आणि सुरेखा हे डेंजर झोनमध्ये राहिले होते. जेव्हा त्यांनी‌ सगळ्यांना विचारले गेले की, त्याच्या मते कोण सेफ असेल? तेव्हा सगळ्यांनी अक्षयचे नाव घेतले. परंतु या आठवड्यात अक्षय एलिमिनेट झाला. हे ऐकून सगळ्यांचं खूप दुःख झालं, सगळ्यांना अश्रू अनावर झाले. (Bigg Boss Marathi 3 : Akshay Waghmare is eliminated this week)

अक्षयचे घरातील प्रत्येक व्यक्तीशी एक चांगले बॉंडिंग झाले होते. घरात त्याच्याबाबत जास्त काही तक्रारी येत नव्हत्या. तसेच तो टास्क देखील उत्तम पद्धतीने खेळत होता. परंतु त्याच्या एलिमिनेशनच्या बातमीने सगळ्यांनाच खूप दुःख झाले. त्यावेळी जयने अक्षयला दारापर्यंत खांद्यावर उचलून आणले. घरातून बाहेर जाताना अक्षय देखील खूप भावुक झाला होता. त्याने सगळ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या आणि बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. नंतर बाहेर आल्यावर मांजरेकरांनी देखील त्याच्याशी गप्पा मारल्या. तसेच त्याचा घरात संपूर्ण प्रवास स्क्रीनवर दाखवला.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

नादच खुळा! अमिताभ बच्चन यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहणाऱ्या बॉडीगार्डला मिळतो ‘इतका’ पगार; आकडा तर वाचा…

अमिताभ नव्हे, तर ‘या’ नावाने आई मारायची हाक; रेखा यांना सोडण्यामागे होते ‘हे’ मोठ्ठे कारण

सलमान खानने बहीण अर्पिताला लग्नात दिलं होतं ‘हे’ महागडं गिफ्ट, किंमत ऐकून तर फिरतील तुमचे डोळे

हे देखील वाचा