Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात भरला मासळी बाजार, पाहायला मिळणार स्पर्धकांची मजा- मस्ती

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील ६० दिवस उलटले आहेत. या पर्वाचे टॉप ९ स्पर्धक मिळाले आहेत. या आठवड्यात स्नेहा वाघ घरातून बाहेर गेली. या खेळातील नवव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्याची थीम मुंबई अशी आहे. मुंबई हे शहर एक स्वप्ननगरी आहे. जिथे जाऊन प्रत्येकजण आपल्या स्वप्नाचा ध्यास घेत असतो. हीच थीम या आठवड्यात असणार आहे. मुंबईमध्ये होत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आता घरात होणार आहे. असं म्हणतात की, मुंबई हे शहर कधीच झोपत नाही. असेच या आठवड्यात बिग बॉसने घरातील स्पर्धकांना न झोपण्याचा टास्क दिला आहे.

घरातील नॉमिनेशन कार्य देखील लोकल ट्रेन स्वरूपात झाले आहे. स्पर्धकांना तिकीट घेऊन ते ट्रेनच्या टीसीला दाखवायचे असते. अशातच घरात मासळी बाजार भरला आहे. यात काही विक्रेते आहेत, तर काही जण ग्राहक आहे. या टास्कमध्ये कमी भावात मासे विकत घ्यायचे असतात. (Bigg Boss Marathi 3 : bigg boss creat fish market in house)

या एपिसोडचा प्रोमो एकदम मजेशीर वाटत आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या घरात कागदाचे मासे आहेत. जे काही स्पर्धक विकत आहेत. यात विकास मीराला सांगतो की, “पापलेट आहे बांगडा आहे.” यावर मीरा म्हणते की, “आणि काय आहे.” तेव्हा विकास म्हणतो की, “सारंगी पण आहे.” यावर सगळेच हसू लागतात.

तसेच, दुसरीकडे जय मीनलला सांगतो की, “एक मासा १२०० रुपयाला आहे.” यावर मीनल म्हणते की, “एवढं महाग कोण घेतंय मग.” तितक्यात विशाल येतो आणि म्हणतो की, “थांबा जरा बँकेत जाऊन येतो कर्ज काढतो.”

हे प्रोमो पाहून सगळ्यांना आता हा एपिसोड बघण्याची उत्सुकता लागली आहे. या टास्कनंतर घरात कॅप्टन कोण होणार आहे हे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आपल्या डान्सने सगळ्यांना भुरळ घातलेल्या अमृता खानविलकरचा असा आहे सिनेसृष्टीतील प्रवास, वाचा

-यह चाँद सा रोशन चेहरा! श्रुती मराठेचा ग्लॅमरस लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

-जोडा असावा तर असा!, मानसी नाईकने पतीसोबत व्हिडिओ शेअर करून लिहिले भन्नाट कॅप्शन

हे देखील वाचा