Monday, July 1, 2024

‘जो वापरेल बेड, त्याच्यावर पडेल रेड’, खेळात अपयश आल्यानंतरही ‘बिग बॉस मराठी’चे सदस्य बनलेत कवी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेक टास्क पाहायला मिळाले आहेत. टास्कनंतर आलेले यश सगळेजण ज्याप्रकारे एन्जॉय करतात त्याचप्रमाणे अपयशाने नाराज होतात. मात्र, या आठवड्यात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. टास्कमध्ये अपयश आल्यानंतर देखील घरातील सदस्य एन्जॉय करताना दिसत आहेत. या आठवड्यात ‘जिंकू किंवा मरू’ हे साप्ताहिक कार्य घरामध्ये रंगले आहे. यात विविध अंतर्गत टास्क होत आहेत. यातील दुसरा टास्क झाला आहे. यात बिग बॉसने दोन टीम पडल्या आहेत. बिग बॉसने सांकेतिक खुणा देऊन काही कोडी तयार केली आहेत. यात पुढची चिठ्ठी घरातील इतर ठिकाणी ठेवलेली असते. या टास्कमध्ये टीम ‘ए’ विजयी होते.

कार्यात टीम ‘बी’ अपयशी झाल्याने बिग बॉसने त्यांना घरातील फर्निचर वापरण्यास बंदी घातली. बिग बॉसचे पुढचे आदेश येईपर्यंत टीम ‘बी’मधील कोणालाही फर्निचर वापरता येणार नाही. अशातच घरात टीम ‘बी’ला दुःख झाले आहे, तरीही त्यांना वेगवेगळ्या कविता आणि गाणी सुचत आहेत. घरात सुरेखा ताई आणि उत्कर्ष गाणी म्हणताना दिसले आहेत. तसेच उत्कर्ष कविता देखील करतो. उत्कर्ष म्हणतो की, “जो वापरेल बेड त्याच्यावर पडेल रेड.” यावर सगळे हसायला लागतात. तसेच यानंतर तो म्हणतो की, “जी वापरेल खुर्ची ती नसेल बिग बॉसच्या घरची.” यावर सगळेच हसायला लागतात. (Bigg Boss Marathi 3 : contestant become poet in house)

घरातील ‘बी’ टीममधील सदस्य जमिनीवर झोपतात, तसेच ते घरातील सोफ्याचा आणि गार्डनमधील खुर्चीचा देखील वापर करत नाहीत. यावेळी बिग बॉसने दोन्ही टीममधील सदस्य एकत्र करून त्यांच्या दोन वेगळ्या टीम बनवल्या होत्या. त्यामुळे यावेळी घरात वेगळेच वातावरण पाहायला मिळाले आहे. तसेच आता या आठवड्यातील हे साप्ताहिक कार्य कोणती टीम जिंकणार आहे. याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

-‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

हे देखील वाचा