Tuesday, July 9, 2024

बिग बॉसचे घर आहे की रेस्टॉरंट? सदस्य करताय खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या डिमांड

बिग बॉस हा शो कसा आहे, यामध्ये काय घडते आदी सर्वच गोष्टी प्रेक्षकांना माहित आहे. बिग बॉसमध्ये टास्क दरम्यान कितीही भांडणं झाली तरी, बिग बॉसच्या ठरवलेल्या नियमात राहूनच सदस्यांना वागावे लागते. बिग बॉसमध्ये फक्त आणि फक्त बिग बॉसचंच आदेश चालतो. सदस्य बिग बॉसला कधीच आदेश देऊ शकत नाही, कोणत्या मागण्या ठेऊ शकत नाही. मात्र बिग बॉस मराठी ३ मध्ये काही सदस्य बिग बॉसला आदेश देत, वेगवेगळ्या मागण्या बिग बॉससमोर ठेवत आहे.

बिग बॉस आदेश देत आहेत, बिग बॉस सांगू इच्छितात असेच वाक्य आणि त्यांचे आदेश या घरातील सदस्यांना ऐकावे लागते. पण नुकतेच जयने घरात काहीतरी वेगळे केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात आणि काही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागते. कधी कधी बिग बॉस त्यांना या गोष्टी मिळविण्याची संधी देखील देतात. पण जयने न राहून बिग बॉस यांना चक्क ऑर्डर दिली आहे. बिग बॉस माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या, जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तर”.

तृप्तीताई म्हणाल्या “सारखं आपलं तुम्ही आमच्या प्रेम करत असाल तर हे पाठवून द्या, ते पाठवून द्या… गायत्री म्हणाली, “त्यांच्या ठरलेल्या गोष्टींपैकी ते पाठवतील ते प्रेम असेल तर बाकी काही नवीन पाठवणार नाहीत. जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. कोणाला चायनीज खायचे आहे, कोणाला लोणचे तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खायचा आहे. कोणाला चिकन तर कोणाला मंचुरियन तर कोणाला पनीर चिली. यांच्या डिमांडकडे बघून असं वाटत आहे की, हे सदस्य विसरले आहेत ते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहेत, कोणत्या रेस्टोरंट मध्ये नाही.

पुढे जयचं म्हणणं होतं अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा. एक नाही संपत तर दुसरी डिमांड तयार होती. असो ! इच्छा व्यक्त करूनच त्यांना जरा बरं वाटलं असावं असं म्हणायला हरकत नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आर्यन खानला देण्यात आलीत विज्ञानाची पुस्तके, इतर आरोपींप्रमाणे त्यालाही मिळतंय नॅशनल हिंदू रेस्टॉरंटमधील जेवण

-‘ते तर या पार्टीमध्ये जाण्यास तयार देखील नव्हते…’, आर्यनचा मित्र अरबाज मर्चंटच्या वडिलांनी सोडले मौन

-शर्लिन चोप्राचा शाहरुख खानवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘त्याच्या पार्टीत लोक पांढऱ्या पावडरचे सेवन…’

हे देखील वाचा