Thursday, June 12, 2025
Home मराठी बिग बॉस मराठीच्या घरात होतोय कल्ला, नृत्याच्या तासाला बाईंसोबत विद्यार्थ्यांनी देखील धरला ठेका

बिग बॉस मराठीच्या घरात होतोय कल्ला, नृत्याच्या तासाला बाईंसोबत विद्यार्थ्यांनी देखील धरला ठेका

बिग बॉस मराठीच्या घरात चौथा आठवडा एकदम मजेत आणि उत्साहात चालला आहे. या आठवड्यात घरात बिबी कॉलेज हा टास्क रंगला आहे. यात घरातील काही सदस्य शिक्षक तर काही सदस्य विद्यार्थी बनले आहेत. त्यामुळे घरात या आठवड्यात कोणताही राडा न होता अत्यंत आनंदाने टास्क सगळे एन्जॉय करत आहेत. शिक्षक अत्यंत सुंदर पद्धतीने विद्यार्थांना शिकवत आहेत तर विद्यार्थी देखील मजा मस्ती करत शिकत आहेत. बिग बॉसने प्रत्येक शिक्षकाला एक विषय निवडून दिला आहे. त्यावर शिक्षकांना शिकवायचे आहे. बिग बॉसच्या घरात कॉलेजचा सेट उभारण्यात आला आहे. तसेच कॉलेजमध्ये एक कॅन्टीन देखील उभारले आहे.

या टास्कमध्ये सुरेखा कुडची या शिक्षकाच्या भूमिकेत आहेत. त्यांना नृत्य हा विषय शिकवायचा आहे. सुरेखा यांचा तास बिबी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप एन्जॉय केला आहे. या तासात त्या डान्सच्या प्रकाराबद्दल सांगतात. तसेच विद्यार्थांना डान्स देखील करायला शिकवतात. त्यांनी त्यांच्या तासात विशालसोबत डान्स केला. त्यांनी ‘ये ना प्रिये ‘या गाण्यावर विशालसोबत जबरदस्त डान्स केला आहे. तसेच बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना देखील त्यांचा हा डान्स खूप आवडला. सगळेजण त्यांचा हा परफॉर्मन्स एन्जॉय करताना दिसत आहेत. या आठवड्यात विशालने सगळ्या तासाला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. परंतु आता सगळे शिक्षक कोणाला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून नेमतील याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. (Bigg Boss Marathi 3 : contestant enjoying BB college task)

या टास्कमध्ये तास संपल्यावर शिक्षक त्यांच्या आवडत्या विद्यार्थ्याला एक स्टार देणार आहेत. असे करून शेवटी ज्या दोन स्पर्धकांकडे सर्वाधिक स्टार असणार आहेत. त्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे. तसेच विद्यार्थी एकमताने ज्या शिक्षकाला सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून निवडतील तो स्पर्धक देखील कॅप्टन पदासाठी उमेदवार असणार आहे. असे मिळून या आठवड्यात तीन स्पर्धकांमध्ये कॅप्टन्सीसाठी टास्क रंगणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

आदेशानंतरही ईडीच्या कार्यालयात हजर नाही झाली जॅकलिन, एजंसीने बजावला तिसरा समन्स

भारीच ना! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय, ऐकून नाचू लागतील चाहते

हे देखील वाचा