Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

बिग बॉस मराठीच्या घरात महिला विशेष आठवड्यातील विजेते घोषित, मांजरेकरांनी घेतली स्पर्धकांची शाळा

या वर्षी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली आहे. हा शो सुरू होऊन फक्त एक आठवडा पूर्ण झाला आहे. एका आठवड्यातच अनेक सदस्यांच्या चांगुलपणाचा बुरखा उतरून त्यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. तसेच घरात सध्या विकेंडचा डाव रंगला आहे. या वर्षी विकेंडला चावडीचे स्वरूप दिले आहे. शो सुरू झाला, तेव्हा सुरुवातीलाच बिग बॉसने हा आठवडा महिला विशेष ठेवला होता. या आठवड्यात घरातील विविध भागांच्या महिला मालकीण होत्या, तर पुरुष त्यांचे सेवक होते. म्हणजेच महिलांना त्या भागाची साफ सफाई पुरुषांकडून करून घ्यायची होती. हा टास्क पूर्ण झाला पण टास्कमध्ये अनेक सदस्यांमध्ये वादाचे खटके उडाले.

या विकेंडला मांजरेकरांनी प्रत्येकाला या आठवड्यातील सर्वात चांगला सेवक आणि सगळ्यात वाईट सेवक तसेच सर्वात चांगली मालकीण आणि सर्वात वाईट मालकीण यांना घरातील सदस्यांना मत देण्यासाठी सांगितले. तेव्हा बहुमताने विशाल निकम हा सर्वात चांगला सेवक झाला तर आविष्कार सर्वात वाईट सेवक ठरला. यामागील सदस्यांचे कारण होते की, विशालने जे पडेल ते काम नीट केले तर आविष्कारला कोणतेही काम सांगितल्यास तो टंगळमंगळ करायचा. तर यामध्ये स्नेहा सर्वात चांगली मालकीण झाली तर शिवलीला ही सर्वात वाईट मालकीण झाली. याचे कारण स्पष्ट करताना सदस्यांनी सांगितले की, स्नेहा खूप चांगल्याप्रकारे शिकवत होती किंवा समजून घेत होती. तसेच शिवलीला जास्त या गेममध्ये दिसली नाही त्यामुळे तिला सर्वात वाईट मालकीण घोषित केले. (Bigg Boss Marathi 3, contestant told the winner of ladies special week)

त्यावेळी मांजरेकर विजयी झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना कसे वाटत आहे हे बोलण्यास सांगितले. यावेळी त्यांनी संतोष चौधरी म्हणजेच दादूस हे या आठवड्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धक होते हे सांगितले. तसेच दादूस यांचे त्यांनी खूप कौतुक केले. आठवड्यात ज्यांनी कोणी वाईट वागणूक केली त्यांची मांजरेकरांनी कानउघडणी केली.

 

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जन्मापासून आतापर्यंतचे निवडक फोटो शेअर करत स्वप्नील जोशीने लेकीला दिल्या जागतिक कन्यादिनाच्या शुभेच्छा

‘अपने पास बहुत पैसा है,’ म्हणत नेहाने अनोख्या अंदाजात दिल्या परीला कन्यादिनाच्या शुभेच्छा

-अखेर प्रतीक्षा संपली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणवीर सिंग अन् दीपिका पदुकोणचा ‘८३’ चित्रपट

हे देखील वाचा