Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगला ‘फळ की निष्फळ’ टास्क, पाहायला मिळाली सदस्यांमधील जुगलबंदी

‘बिग बॉस मराठी’च्या घरात तिसरा आठवडा चांगलाच रंगला आहे. मागच्या आठवड्यात घरात जे ग्रूप बनले होते, ते या आठवड्यात बिग बॉसने वेगळे केले आहेत. बिग बॉसने दोन्ही ग्रूपमधील सदस्य एकत्र करून ग्रूप बनवले आहेत. अशातच आठवड्यात घरात ‘जिंकू किंवा लढू’ हे साप्ताहिक कार्य चालू आहे. या कार्यात अनेक उपकार्य आहेत. यात जी टीम जास्तीत जास्त वेळा विजय मिळवेल ती टीम कॅप्टन्सी टास्कसाठी जाईल, असे बिग बॉसने सांगितले आहे. यातच बिग बॉसने आता ‘फळ की निष्फळ’ हे कार्य घरातील सदस्यांवर सोपवले आहे.

बिग बॉसने घरातील सदस्यांसमोर ‘फळ की निष्फळ’ या कार्याची घोषणा केली. या कार्यात घरातील सदस्यांना त्यांच्या टोपलीत जास्तीत जास्त फळे गोळा करायची आहेत. जो ग्रूप जास्तीत जास्त फळे जमा करेल, तो ग्रूप या उपकार्यातील विजेता ग्रूप घोषित होईल असे सांगितले. तसेच जो ग्रूप या कार्यात अपयशी होईल, त्यांना बिग बॉसच्या पुढच्या आदेशापर्यंत घरातील फळे खाण्यास बंदी राहणार आहे. यातील महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील सगळी फळे स्विमिंग पूलमध्ये जमा करून टोपलीत घ्यायची असतात. यावेळी ग्रूपमधील इतर सदस्य सगळी फळे जमा करून स्विमिंग पूलमध्ये टाकताना दिसले आहेत. हा टास्क घरातील सदस्यांमध्ये अटीतटीचा होतो. तसेच हा टास्क ‘ए’ टीम जिंकते. (bigg boss marathi 3 : contestent play a task of fal ki nishfal)

त्यामुळे बिग बॉसच्या घरात या आठवड्यात जास्तीत जास्त उपकार्य जिंकून ‘ए’ टीम विजेती झाली आहे, असे घोषित करतात. सोबतच टीममधील सगळ्या सदस्यांना एक मताने कॅप्टन पदासाठी दोन नावे सुचविण्यास सांगतात. त्यावेळी टीममधील सदस्यांमध्ये वाद होतात. कारण प्रत्येकाला कॅप्टन बनण्याची संधी हवी असते.

परंतु त्यांचे एकमत न झाल्याने बिग बॉस आता कॅप्टन पदाचे दोन उमेदवार निवडण्याची संधी ‘बी’ टीमला देतात. हे ऐकून ‘बी’ टीममधील सदस्य खूपच खुश होतात. आता टीम ‘बी’ कोणत्या दोन सदस्यांची नावे सुचवणार आहेत, हे पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस मराठी ३’मध्ये कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन? ‘या’ टीमला मिळाली सुवर्णसंधी

-गायत्री दातारच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ; कौतुक करत म्हणाले; ‘स्वर्गातील राणी’

-‘हा पुर्णविराम नाही, तर अर्धविराम…’, अभिनेत्री तेजस्वी पंडीतचे चाहत्यांना खास पत्र; जरुर वाचा

हे देखील वाचा