Monday, June 9, 2025
Home मराठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलाय यमक जुळवणारा खेळ, खेळातंच मारले जातायेत एकमेकांना जोरदार टोमणे

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलाय यमक जुळवणारा खेळ, खेळातंच मारले जातायेत एकमेकांना जोरदार टोमणे

‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातील खेळ चांगलाच रंगात आला आहे. एकेक दिवस जातोय तसा प्रत्येक स्पर्धकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहे. टास्क, दुश्मनी, टीम यासोबत या घरात जोरदार मनोरंजन देखील पाहायला मिळत असते. टास्क संपल्यानंतर सदस्य एकत्र बसून अनेकवेळा गप्पा मारत असतात. त्यांच्यातील मजेशीर गप्पा ऐकायला प्रेक्षकांना देखील खूप आवडतात. अशातच बिग बॉसच्या घरात हल्लाबोल हे कार्य पार पडले आहे. यानंतर सदस्यांनी शब्दांना यमक जुळवून छान कविता स्वरूपात एकमेकांना टोमणे मारले आहेत. यावेळी तिथे आविष्कार दार्व्हेकर, सोनाली पाटील, सुरेखा कुडची, तृप्ती देसाई, मीनल शाह, संतोष चौधरी हे उपस्थित होते. यावर त्यांची चांगलीच मैफिल भरली. याआधी देखील दादूस यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून स्पर्धकांचे तसेच प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केले आहे. अशातच त्यांचा यमक जुळवण्याचा खेळ सगळ्यांनाच खूप आवडला होता. (bigg boss marathi 3 : contestent playing aintresting game in hause )

यामध्ये मीनल आणि सोनाली या दोघी किचनमध्ये काम करत असतात. आविष्कार देखील तिथे उभा असतो. तसेच दादूस आणि तृप्ती हे दोघे डायनिंग टेबलवर बसलेले असतात. यावेळी दादूस म्हणतात की, “बिग बॉसच्या घरात आविष्काराने केला अंड्याचा ब्लास्ट, हा होता त्याचासाठी चान्स लास्ट.” यावर सगळेच त्यांचे खूप कौतुक करतात. यावर तृप्ती म्हणतात की, “पण मीनल आणि सोनाली करतायेत काम फास्ट.” यावर सगळेच हसतात आणि दादूस म्हणतात की, “बिग बॉस म्हणतील की, तुम्ही सगळे यमक घेऊन गेलेत.” यानंतर ते म्हणतात की, “यमक म्हणजे हिच तुमच्या लाईफची चमक.” यावर सोनाली म्हणते की, “आता आमच्यासमोर कोणाची बोलायची नाही धमक.” यावर तृप्ती म्हणतात की, “म्हणून तुम्ही काल टाकलं का नमक.” यावर सोनाली म्हणते की, “म्हणूनच तुमच्या चेहऱ्यावर आली का चमक.” नंतर आविष्कार म्हणतो की, “फायनली जुळले सगळे यमक.”

अशा प्रकारे बिग बॉसच्या घरात यमक जुळण्याचा खेळ पाहायला मिळाला आहे. टास्क संपल्यानंतर सगळे सगळे सदस्य एकत्र येऊन मस्ती करताना दिसले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ

-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

हे देखील वाचा