Saturday, June 29, 2024

‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ स्पर्धकाचा झालाय दोनदा घटस्फोट, घरात करावा लागतोय पहिल्या पतीशी सामना

टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो ‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व नुकतेच चालू झाले आहे. यावर्षी कलाकारांसोबत अनेक सामान्य नागरिकांचे देखील शोमध्ये आगमन झाले आहे. शोमधील स्पर्धक खूप चर्चेत आहेत. स्पर्धक बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अशातच ही गोष्ट समोर आली आहे की, या शोमधील दोन स्पर्धक कपल होते, पण आता त्या दोघांचा घटस्फोट झाला आहे. ते स्पर्धक म्हणजे स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर होय.

स्नेहा आणि आविष्कार हे घटस्पोटी जोडपे आहे. सुरुवातीला या शोमध्ये स्नेहाची एन्ट्री झाली आणि नंतर आविष्कारची एन्ट्री झाली. तो आल्यानंतर स्नेहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले जास्त कोणी पाहिले नाही. स्नेहा जेव्हा १९ वर्षाची होती, तेव्हा तिने आविष्कारसोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षानंतर ते विभक्त झाले. तिने आविष्कारवर घरगुती अत्याचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर तिने घटस्फोट घेतला. (Bigg Boss Marathi 3 contestent sneha wagh and avishkar darvhekar is ex couple, let’s know about their personal life)

त्यानंतर तिला मानसिक तणावाला समोर जावे लागले होते, पण या सगळ्यातून बाहेर येऊन तिने तिच्या करिअरकडे लक्ष दिले होते. तिने मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या पहिल्या घटस्फोटानंतर तिने तब्बल सात वर्षांनी पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली. स्नेहाने इंटेरियर डिझायनर अनुराग सोलंकीसोबत लग्न केले होते. परंतु त्यांच्यात वैयक्तिक कलह झाले आणि लग्नाच्या आठ महिन्यांनंतर ते विभक्त झाले.

नुकतेच बिग बॉसच्या घरात आविष्कारने एक सुंदर कविता सादर केली होती. त्याच्या या कवितेला सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. त्यावेळी स्नेहा देखील त्याची ही कविता ऐकत होती, पण ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत इतरत्र बघत होती. कविता सादर झाल्यानंतर आविष्कारने स्नेहाला विचारले की, तिला कविता कशी वाटली? तिने सांगितले की, ही कविता तिने या आधी कधीच ऐकली नव्हती.

आता ते दोघे घरात कसे वागणार आहेत, त्यांचे तुटलेले हे बंध बिग बॉसमुळे जवळ येतील की त्यांच्या नात्यात आणखी अंतर येईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा

-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा