Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘बिग बॉस मराठी’च्या घरावर केला एलियनने कब्जा, स्पर्धकांचा उडाला थरकाप

‘बिग बॉस मराठी’च्या घरामधून नुकतेच नीथा शेट्टी – साळवी घराबाहेर पडली. दोन आठवड्यापूर्वी तिची घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. परंतु प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा न मिळाल्याने ती घराबाहेर गेली आहे. मागील आठवडा तसा पाहायला गेला तर काही अवघड नव्हता; परंतु भावनिकदृष्टया घरातील सदस्य किती कठोर आहेत याची परीक्षा बिग बॉसने घेतली आहे. नीथा घरातून बाहेर पडली आणि ‘बिग बॉस मराठी’ तिसऱ्या पर्वातील टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. आता इथून पुढे टास्क आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही. आता हे टॉप १० सदस्य कसा खेळ खेळतील? या आठवड्यात कोण कोणते सदस्य नॉमिनेशनमध्ये जातील ? कोण घराचा कॅप्टन बनेल ? साप्ताहिक कार्य काय असेल ?  याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

नुकतेच समोर आलेल्या प्रोमोनुसार, ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर एलियनने कब्जा मिळवला आहे. त्यामुळे घरातील सगळ्या लाईट गेल्या आहेत. घरातील सगळेच सदस्य खूप घाबरले आहे. त्यावेळी बिग बॉसने घरातील सगळ्या सदस्यांना लिव्हिंग रूममध्ये एकत्र यायला सांगितले. यावेळी सगळेच खूप घाबरतात. हे नक्की काय असणार आहे याची सगळ्यांना उत्सुकता तर लागलीच आहे, सोबतच हे आपल्यावर कोणते संकट तर नाही ना याची सगळ्यांना भीती वाटत आहे. परंतु हा कदाचित घरातील टास्क असावा असा सगळेजण अंदाज लावत आहेत. (Bigg Boss Marathi 3 : elian capture bigg Boss Marathi house)

तसेच आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये विकास घरातील सदस्यांना घाबरवत आहे. तो मीराला घाबरवत असतो तेव्हा ती अंगावर ब्लँकेट घेऊन झोपते आणि जयला विचारते की, विकास गेला का? यावर जय तिला हो म्हणतो; परंतु विकास तिथेच बसलेला असतो त्याला पाहून ती पुन्हा खूप घाबरते.

या भागात नक्की काय होणार आहे आणि घरावर खरंच एलियनने ताबा मिळवला आहे की, हा टास्क आहे? हे आता आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

हे देखील वाचा